एक्स्प्लोर

Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या'चा प्रदर्शित होणार शेवटचा भाग पण ब्रेकनंतर पुन्हा परतणार? झी मराठीने दिली कार्यक्रमाबाबत मोठी अपडेट

Chala Hawa Yeu Dya : मागील काही वर्षांपासून चला हवा येऊ द्या प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पण याचसंदर्भातली पुन्हा एक अपडेट समोर आलीये.

Chala Hawa Yeu Dya : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम मागील 10 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता. पण आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  दरम्यान चॅनलकडून या कार्यक्रमाला निरोप देण्याआधी पुन्हा एक मोठी अपडेट समोर आलीये. कारण आम्ही या कार्यक्रमाला निरोप देत आहोत तेही पुन्हा परत येणाच्या वचनासोबत असं म्हटलं आहे. त्यामुळे चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सुरु होणार का याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

रविवार 17 मार्च रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित केला करण्यात येणार आहे. पण यावर बोलताना चॅनलने सांगितलं की, 'चला हवा येऊ द्या' या  कार्यक्रमाचा शेवटचा भाग जरी प्रसारित होणार असला तरी प्रेक्षकांनी निराश होऊ नका. कारण एका अल्पविरामानंतर हा कार्यक्रम तुमच्या त्याच लाडक्या टीमसोबत पुन्हा एकदा हसवायला आणि तुमचं मनोरंजन करायला सज्ज होणार आहे.

कार्यक्रमाने मनोरंजनाचा स्तर एका वेगळ्या टप्प्यावर नेला - व्ही.आर. हेमा

'चला हवा येऊ द्या' ह्या रिऍलिटी शोबद्दल बोलताना झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर ‘व्ही.आर. हेमा’ म्हणाल्या, "चला हवा येऊ द्या ह्या कार्यक्रमाने मनोरंजनाचा स्तर एका वेगळ्या टप्यावर नेऊन ठेवला आहे. ह्या टीम मधल्या प्रत्येकानी लोकांच्या हृदयात आपलं घर निर्माण केले. वाहिनीसोबत असलेलं ह्यांचं नातं हे अलौकिक आहे. तुमच्या लाफ्टर डोसचा बुस्टर डोस घेऊन ही टीम तुमच्यासाठी नव्या जोमात परत येणारआहे".  

झी मराठी वरील नव्या मालिकेतील कलाकार दिसणार शेवटच्या भागात

झी मराठी वाहिनीवर काही दिवसांपूर्वी शिवा आणि पारु या दोन नव्या मालिका सुरु झाल्या आहेत. याच मालिकेतील कलाकार हे चला हवा येऊ द्या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहेत. या अखेरच्या भागात झी मराठी परिवारात दाखल झालेले आणि नव्याने दाखल होणाऱ्या मालिकांचे म्हणजेच 'पारू', 'शिवा', 'पुन्हा कर्तव्य आहे' आणि  'नवरी मिळे हिटलरला'चे  प्रमुख कलाकार 'चला हवा येऊ द्या' च्या टीम सोबत आपल्याला मंचावर डान्स आणि विनोदाची अतिशबाजी करताना दिसणार आहेत. 

ही बातमी वाचा : 

Fateeh teaser launch : अभिनयासह दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही सोनू सूद करणार का 'फतेह'? चित्रपटाचा टीझर रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Naresh Mhaske Full Speech Thane Sabha: राज ठाकरेंनी माझ्यावर हात ठेवला नसता तर...Shrikant Shinde Full Speech : शिवसेना-मनसे फेव्हिकॉल का मजबूत जोड,  राज ठाकरेंसमोर जोरदार भाषणRaj Thackeray on Shivsena Stage Thane  : 19 वर्षांनी राज ठाकरेंचं शिवसेनेच्या मंचावर पहिलं पाऊल....Raj Thackeray Thane Speech : शिवसेनेचा मंच, बाळासाहेबांची स्टाईल! राज ठाकरेंकडून भाषणाची सरुवात कशी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
Embed widget