Sholay सिनेमातून सचिन पिळगावकरांचा गब्बरसोबतचा 'तो' सीन हटवला होता, 50 वर्षांनी कारण समोर!
Sholay Movie Sachin Pilgaonkar scene with Gabbar : Sholay सिनेमातून सचिन पिळगावकरांचा गब्बरसोबतचा 'तो' सीन हटवला होता, 50 वर्षांनी कारण समोर!

Sholay Movie Sachin Pilgaonkar scene with Gabbar : बॉलिवूडमध्ये सर्वात ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘शोले’ या सिनेमाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात अभिनेता सचिन पिळगावकर यांनी रहीम चाच्यांच्या मुलाची भूमिका साकारली होती, ज्याबद्दल त्यांनी एक खास किस्सा सांगितला आहे. काही दिवसांपूर्वीच आयएएनएसशी संवाद साधताना सचिन पिळगावकर यांनी उघडपणे सांगितले की, दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी चित्रपटातील त्यांचा एक खास सीन काढून टाकला होता आणि त्यामागील काही कारणेही सांगितली होती. (Sholay Movie Sachin Pilgaonkar scene with Gabbar )
सचिन पिळगावकर यांचा गब्बरसोबतचा 'तो' सीन रमेश सिप्पींनी हटवला
सचिन पिळगावकर म्हणाले, “मला मारण्याचा जो सीन होता, तो गब्बरच्या अड्ड्यावर शूट झाला होता, पण रमेशजींनी काही कारणांमुळे तो सीन एडिटिंगमध्ये काढून टाकला. (Sholay Movie Sachin Pilgaonkar scene with Gabbar )
पहिले कारण म्हणजे चित्रपट खूप लांबला होता, त्यामुळे तो सीन काढावा लागला. दुसरे कारण असे की, रमेशजींना वाटले की 16-17 वर्षांच्या मुलाची हत्या होताना दाखवणे थोडे विचित्र वाटेल. मग शेवटच्या सीनमध्ये गब्बरच्या हातावर एक काळी मुंगी चालताना दाखवली आहे. ती पाहून गब्बर म्हणतो, “रामगडचा मुलगा आला आहे,” आणि ती मुंगी चिरडून टाकतो. त्यानंतर गावात माझा मृतदेह घोड्यावरुन आलेला दाखवला जातो, ज्यातून स्पष्ट होते की मला गब्बरने ठार मारलं आहे. (Sholay Movie Sachin Pilgaonkar scene with Gabbar )
गब्बरसोबतचा एक खास सीन होता, तो काढून टाकल्याने वाईट वाटले ; सचिन पिळगावकर
सचिन पिळगांवकर म्हणाले की त्या काळी एका अभिनेता म्हणून ‘शोले’मधील हा सीन कापल्यामुळे त्यांना खूप वाईट वाटले होते. ते म्हणाले, “त्या वेळी मला खूप वाईट वाटलं, कारण माझा गब्बरसोबतचा एक खास सीन होता आणि तो काढून टाकला गेला. प्रत्येक अभिनेत्याला तसं वाटेल. पण आज, जेव्हा मी स्वतः दिग्दर्शक आहे, तेव्हा मला जाणवतं की रमेशजींनी जे केलं ते योग्य होतं.”
सचिन पिळगावकर म्हणाले की, दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या दृष्टीकोनातून ते रमेश सिप्पींच्या निर्णयाचा सन्मान करतात. ‘शोले’ चित्रपटात सचिन यांचं पात्र गब्बरकडून ठार मारलं जातं. दरम्यान, रमेश सिप्पी यांच्या शोले या सिनेमाला आता 50 वर्षे पूर्ण झाले आहेत. (Sholay Movie Sachin Pilgaonkar scene with Gabbar )
इतर महत्त्वाच्या बातम्या























