CID मध्ये ACP प्रद्युम्न यांचा मृत्यू होणार, मालिका निर्मात्यांचा मोठा निर्णय!
shivaji satam character acp pradyuman : CID मध्ये ACP प्रद्युम्न यांचा मृत्यू होणार, मालिका निर्मात्यांचा मोठा निर्णय!

shivaji satam character acp pradyuman : सीआयडी या टिव्ही मालिकेने आजवर अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली. दरम्यान, या मालिकेतील पुढील भागांबाबत शॉकिंग बातमी समोर आली आहे. मालिकेतील येणाऱ्या भागात ACP प्रद्युम्न यांचा मृत्यू होणार आहे. हे पात्र अभिनेते शिवाजी साटम यांनी साकारलेलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मालिकेच्या पुढील भागात ACP प्रद्युम्न या पात्राचा बॉम्बस्फोटात मृत्यू होणार आहे.
View this post on Instagram
एका एपिसोडमध्ये तिग्मांशू धुलियाचे पात्र बारबोसा सीआयडी टीमवर बॉम्ब हल्ल्याची योजना आखणार आहे. या हल्ल्यात सीआयडीचे उर्वरित सदस्य वाचतील, तर एसीपी प्रद्युम्न यांचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. इंडिया टुडेच्या माहितीनुसार, ‘टीमने नुकतेच या एपिसोडचे शूटिंग केले असून, येत्या काही दिवसांत ते प्रसारीत केले जाणार आहे. सध्या याबाबत फारशी माहिती देण्यात आलेली नाही, कारण निर्मात्यांना याद्वारे चाहत्यांना मोठे सरप्राईज द्यायचे आहे.
क्राईम थ्रिलर मालिका 'सीआयडी'चा दुसरा सीझन आता नेटफ्लिक्सवर चाहत्यांसाठी उपलब्ध असणार आहे. दर्शकांनी 21 फेब्रुवारीपासून सीझन 2 चे पहिले 18 भाग पाहण्यास सुरुवात केली आहे आणि 22 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांना दर शनिवार आणि रविवारी रात्री 10 वाजता नवीन भाग पाहाता येणार आहेत. सोनी एंटरटेनमेंट चॅनलवर सीआयडीचे प्रसारण सुरू आहे आणि ते सोनी LIV वर देखील पाहाता येणार आहे.
टीव्हीवर 'सीआयडी' शो 6 वर्षांनंतर परत येण्याबाबत शिवाजी साटम म्हणाले होते, 'या मालिकेत दया-अभिजीतची जोडी आता तुटली असून दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे सीआयडीची मुख्य पात्र डळमळीत झाली आहेत. 6 वर्षांनंतर एसीपी प्रद्युम्न म्हणून पुनरागमन करणे हे स्वप्नासारखे आहे. एक पात्र ज्याला खूप प्रेम मिळाले आहे आणि आम्ही वचन देतो की हा प्रवास थरार, सस्पेन्स आणि हृदय पिळवटून टाकणारा नाट्यमय असेल.
20 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करणारी टीव्ही मालिका 'सीआयडी' ऑक्टोबर 2018 मध्ये बंद झाली होती. या शोमध्ये काम करणारे कलाकार त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रत्येक घराघरात ओळखले जाऊ लागले. या मालिकेत शिवाजी साटम व्यतिरिक्त आदित्य श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























