Sharad Ponkshe, Aadesh Bandekar : 'मी कधीच काही विसरलो नाही'; आदेश बांदेकर आणि शरद पोंक्षे यांची सोशल मीडियावर शाब्दिक चकमक
आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्या या पोस्टला शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी प्रतिउत्तर देत एक पोस्ट शेअर केली आहे.
Sharad Ponkshe, Aadesh Bandekar : सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय नाट्यात आता मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्यांनी उडी घेतली आहे. आदेश बांदेकर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे कॅन्सरशी झुंज देत असताना त्यांना मदत केलेल्या व्यक्तींचा उल्लेख करताना दिसत आहेत. या व्हिडीओला आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी कॅप्शन दिलं, 'हा शरद पोंक्षे तुच ना?' आता आदेश यांच्या या पोस्टला शरद पोंक्षे यांनी रिप्लाय देत एक पोस्ट शेअर केली आहे.
आदेश बांदेकर आणि शरद पोंक्षे यांच्यामध्ये सोशल मीडियावरील शाब्दिक चकमकीची सुरुवात शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या पोस्टनंतर झाली. शरद यांचे 'दुसरं वादळ' हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाचा फोटो आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो शरद पोंक्षे यांनी शेअर केला होता. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, "कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा आणि माझा एक फोटोही छापलाय यात ! त्यांनी केलेल्या मदतीबद्दल यात सविस्तर लिहिलंय' त्यानंतर आदेश बांदेकर यांनी शरद पोंक्षे यांचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये कॅन्सरशी झुंझ देत असताना आदेश बांदेकर यांनी मदत केली, असा उल्लेख शरद पोंक्षे करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करुन 'हा शरद पोंक्षे तुच ना?' असं कॅप्शन आदेश बांदेकर यांनी दिली.
पाहा आदेश बांदेकर यांची पोस्ट:
View this post on Instagram
त्यानंतर आता शरद पोंक्षे यांनी त्यांच्या दुसरे वादळ पुस्तकाचा एक फोटो शेअर केला आहे. शरद पोंक्षे यांनी पुस्तकाचा फोटो शेअर करुन त्याला 'शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही' असं कॅप्शन दिलं आहे. तसेच आदेश बांदेकर यांना शरद पोंक्षे यांनी टॅग देखील केलं आहे.
पाहा शरद पोंक्षे यांची पोस्ट:
View this post on Instagram
हेही वाचा: