एक्स्प्लोर

Father's Day 2024 : 'माझ्या मुलांमुळे त्यांना सांभाळणं सोप्पं जाईल', संकर्षण करणार 'ड्रामा ज्युनिअर्स'चं परीक्षण, फादर्स डे निमित्त शेअर केला अनुभव

Sankarshan Karhade : अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा "ड्रामा ज्युनिअर्स" या कार्यक्रमामध्ये परीक्षक म्हणून दिसणार आहे. 

Sankarshan Karhade : अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हा लवकरच झी मराठीवर दिसणार आहे. "ड्रामा ज्युनिअर्स"मध्ये तो चिमुकल्या स्पर्धकांना मार्गदर्शन करताना दिसेल.आपल्या खाजगी आयुष्यात संकर्षण दोन चिमुकल्यांचा बाबा आहे आणि त्यांनी फादर्स डेच्या निमित्ताने आपला बाबा म्हणून अनुभव शेअर केला आहे. वडीलांचं स्थान हे प्रत्येकाच्या आयुष्यात विशेष असतं. त्याचविषयी संकर्षण व्यक्त झाला आहे.  तसेच त्यांनी त्याच्या बाबांकडून कोणते गुण घेतले याविषयी देखील तो बोलला आहे. 

संकर्षण कऱ्हाडे हा छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर त्याने प्रेक्षकांच्या मनं जिंकत रंगभूमीवरही छाप सोडली. काही महिन्यांपूर्वीच तो माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेतली त्याची समीर ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. 

बाबा म्हणून मी खूप संयम शिकलो - संकर्षण कऱ्हाडे

संकर्षणने म्हटलं की, मी दोन जुळ्या मुलांचा बाबा आहे. 27 जून रोजी द्या दोघांना तीन वर्ष पूर्ण होतील. पण बाबा म्हणून मी खूप संयम शिकलो आहे आणि या कार्यक्रमाचे परीक्षण करताना या संयमाचा खूप उपयोग होणार आहे. आधी मी जितका अधीर होतो तितका राहिलो नाही. कारण लहान मुलांना सांभाळणं, त्यांना वाढवणं अतिशय संयमाचं काम आहे. ते कुठल्या क्षणी काय मागतील, कसे वागतील, कसे पाहतील आणि काय करतील ह्याचा काहीच नेम नसतो.अश्यावेळी तुम्ही थकलेले असाल, तुम्ही काम करून घरी आलेले असाल, वेगळ्याविचारात असाल त्याच्यावर तुम्हाला रागवून रिऍक्ट करण्याची परवानगीच नाही. 

मला ते रडलेले अजिबात आवडत नाहीत - संकर्षण 

पुढे संकर्षणने म्हटलं की, त्यांना कळत नाही की ते आता काय करतायत त्याच्यामुळे त्यांना सांभाळणं आणि हसतं ठेवणं भयंकर  संयमाचं काम आहे. एक बाबा म्हणून माझा प्रचंड संयम वाढलाय.मी माझा राग राखून ठेवतो आणि जीव उधळून प्रेम करतो. मला माझी लहान बाळं एक क्षण ही रडलेले आवडत नाही. मी माझ्या बायकोला शलाकाला तेच सांगोत की ते रडत असताना त्यांना काय पाहिजे ते दे आणि जेव्हा त्यांचं रडणं थांबत त्यांना मी जवळ घेऊन समजावतो आणि त्यांना ते कळत.

बाबांच्या या गोष्टीचं तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करतो - संकर्षण

बाबांविषयी बोलताना संकर्षणने म्हटलं की,'माझ्या बाबांबद्दल बोलायचं झालं तर ते अत्यंत प्रामाणिक, दिलंय  ते काम नियमाने नित्याने सचोटनी करणारा माणूस. हा बाबांचा गुण मला खूप आवडतो. त्यांच्यातली भावनिकता आणि खरेपणा खूप आवडतो आणि त्यांचा मुलगा म्हणून मी कायम माझ्या वागण्यात तो प्रामाणिकपण आणि ती भावनिकता आणायचा प्रयत्न करतो. बाबानी संपूर्ण कुटुंबाला उत्तम आयुष्य कसं द्यायचं हे काटाक्षने पाळलं आणि एक छान आयुष्य दिलं आणि त्याचंच मी तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करत आहे.'

ही बातमी वाचा : 

Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर मुंज्याचा दबदबा, आदित्य सरपोतदारचा सिनेमा 100 कोटींच्या घरात जाणार? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHarshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारीPune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
Embed widget