Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर मुंज्याचा दबदबा, आदित्य सरपोतदारचा सिनेमा 100 कोटींच्या घरात जाणार?
Munjya Box Office Collection :बॉक्स ऑफिसवर सध्या मराठी दिग्दर्शक आदित्य सरपोतदारच्या सिनेमाची जादू पाहायला मिळतेय. हा सिनेमा 100 कोटींच्या घरात पोहचणार का याची उत्सुकता प्रत्येकाला लागून राहिली आहे.
Munjya Box Office Collection : आदित्य सरपोतदार (Aaditya Sarpotdar) दिग्दर्शित मुंज्या (Munjya) या सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) तुफान कमाई करतोय. पहिल्याच आठवड्यात या सिनेमाने 30 कोटींचा टप्पा पार केला आहे. मोठी स्टारकास्ट नाही, बिग बजेटही नाही तरीही प्रेक्षकांच्या पसंतीस हा सिनेमा उतरत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे.
मराठमोळी शर्वरी वाघ आणि अभय वर्मा मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं चित्र सध्या बॉक्स ऑफिसवर आहे. त्यामुळे जर सिनेमाची गोष्ट उत्तम असेल तर प्रेक्षक वर्गही सिनेमागृहाकडे वळेल, असं या सिनेमाने सिद्ध केलं आहे. बॉलीवूडच्या सध्या रिमेकच्या शर्यतीमध्ये मुंज्याची गोष्ट ही अनेकांना आवडतेय, त्यामुळे या सिनेमाने पहिल्या आठवड्यातच 32 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे जर या सिनेमाची घोडदौड अशीच सुरु राहिली तर हा सिनेमा 100 कोटींच्या घरात जाण्याची देखील शक्यता आहे.
मुंज्याची बॉक्स ऑफिसवरची कमाई
मुंज्या सिनेमा 7 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पहिल्याच दिवशी 4.21 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 जून रोजी सिनेमाची कमाई 7.40 कोटी रुपये इथपर्यंत पोहचली. त्यानंतर 9 जून, 8.43 कोटी, 10 जून 4.11 कोटी, 12 जून 4.11 कोटी अशा या सिनेमाची पहलिया आठवड्यातली कमाई ही 32.47 कोटी रुपये झाली आहे.
View this post on Instagram
भेडिया' युनिव्हर्सचा हिस्सा...
या चित्रपटाच्या पोस्ट क्रेडिट सीन्समध्ये वरुण धवन आणि अभिषेक बॅनर्जी दिसले आहेत. त्यामुळे या चित्रपटाची कथा आता इतर चित्रपटाच्या कथेशी कनेक्ट असू शकते. त्यामुळे आता भेडिया अथवा 'मुंज्या' चित्रपटाचा पुढे कोणता भाग आला तर तो चित्रपट समजण्यास अडचण येऊ नये यासाठी देखील अनेकजण 'मुंज्या' पाहण्यास जात आहे. ''मुंज्या'' हा 'भेडिया' युनिव्हर्सचा एक भाग असल्याच्या चर्चेचा फायदा मिळत आहे.