एक्स्प्लोर

Sanjay Mone : अमित ठाकरेंनी वेगात वाहन चालवून एकही गुन्हा केलेला नाही; 'राजपुत्रा'ला मत का द्याल? संजय मोनेंनी सांगितले महत्त्वाचे 10 मुद्दे

Sanjay Mone on Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी संजय मोनेंची खास पोस्ट सध्या चर्चेत आलेली आहे.

Sanjay Mone on Amit Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) पहिल्यांचा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. माहीमच्या मतदारसंघातून (Mahim Assembly Constituency) अमित ठाकरे यंदाच्या महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघाकडे लागून राहिलंय. अमित ठाकरेंसाठी राज ठाकरेंपासून संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आणि मनसे पक्षाचे कार्यकर्ते मैदानात आहेत. इतकच नव्हे तर कलाकार देखील अमित ठाकरेंसाठी प्रचाराच्या रिंगणात उतरल्याचं चित्र आहे. नुकतच अभिनेते संजय मोने (Sanjay Mone) यांनी देखील अमित ठाकरेंसाठी खास पोस्ट केली आहे. 

मनसेच्या व्यासपीठावरुन शरद पोंक्षे, संजय नार्वेकर यांनी खणखणीत भाषणं ठोकलीत. त्यामुळे अमित ठाकरेंसाठी पक्षासोबत सिनेसृष्टीही प्रचारासाठी कसोशीचे प्रयत्न करताना दिसतेय. संजय मोने यांनी कलाकारांना विनंती करत अमित ठाकरेंना मत देण्यासाठीचे महत्त्वाचे 10 मुद्देही सांगितले आहेत. 

संजय मोनेंची कलाकारांना विनंती

संजय मोनेंनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, 'माझी सर्व कलाकारांना विनंती आहे,तुमचे विचार समाज ऐकतो,तुमची वाह वाह करतो.चा अर्थ असा नाही की तुम्ही म्हणाल ते सगळे  लोक ऐकतील.आपल्या कलाकारांना समाज फक्त आणि फक्त एक मनोरंजन करणारी व्यक्ती म्हणून ओळखतो.तुम्ही गंभीर भूमिका करा किंवा विनोदी भूमिका करा तुम्ही फक्त काही क्षणांचं,त्यांचं वेळ घालवायचं एक खेळणं असता.कधीही तुमच्या खांद्यावर हात टाकून एक सेल्फी घेण्याइतकीच तुमची किंमत असते.'

पुढे त्यांनी म्हटलं की, 'तेव्हा या निवडणुकीसाठी उगाच प्रचार करून आपण परिस्थिती बदलू शकतो या भ्रमात राहू नका.आपला आत्मसन्मान विकू नका. कारण निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला कुणीही हिंग लावून विचारणार नाही. (हिंग लावून विचारणं हि एक म्हण झाली.प्रत्यक्षात हिंग महाग असतो)तेव्हा या वेळी पक्ष नाही तर व्यक्तीला मतदान करा.दरम्यान अमित ठाकरेंना का निवडून देऊ नये या मुद्द्याचाही विचार केल्याचं संजय मोने यांनी म्हटलं आहे. पण यासाठी त्यांना एकच मुद्दा सापडल्याचं त्यांनी म्हटलं. '

अमित ठाकरेंना मत देण्यासाठी सांगितले महत्त्वाचे 10 मुद्दे

अमित ठाकरेंना मत देण्यासाठीचे मुद्दे सांगताना संजय मोनेंनी म्हटलं की,  'आता माझ्या माहीममतदार संघाबद्दल.इथे बरेच उमेदवार आहेत.त्यातले बरेच विविध पक्षांची सफर करून आले आहेत.त्यांना स्वतःला तरी त्यांचा मूळ पक्ष आठवत असेल का?निशाणी म्हणजे पक्ष नाही. माझ्या मतदारसंघात मित ठाकरे उमेदवार आहेत.त्यांना मत का द्यायचं?याची कारणं मला सांगावीशी वाटतात.'
 1. ते आधीपासून त्याच पक्षाशी निगडीत आहेत.
 2.त्यांचा या मतदार संघाशी जन्मापासून संबंध आहे.
 3. तरुण आहेत त्यामुळे नव्या पिढीचे जे काही प्रश्न आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत त्याबद्दल त्यांना चांगली माहिती आहे.
4. निवडून आल्यानंतर काही काम करण्याची वेळ येईल तेंव्हा समोर आलेला प्रश्न मराठी,हिंदी (ही लादली गेलेली भाषा आहे )किंवा इंग्रजी (ही आल्या तथाकथित मराठी समाजाने लादून घेतलेली भाषा आहे)या तीनही भाषेत आला तर त्याचा निदान अर्थ समजण्या इतकी त्यांची कुवत आहे.
5. त्यांच्या मतदार संघातले प्रश्न त्यांच्या वडिलांमुळे (मा.श्री.स्वरराज ठाकरे)त्यांना पूर्ण अवगत आहेत 
 6. आता निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे राहिल्याच्या आधी कुठेही त्यांच्या बद्दल सर्व सामान्य जनतेत भीती धाक दपटशा अशी भावना नाही.
 7. वेगात वाहन चालवून अपघात केल्याची एकही नोंद नाही.
8. एका कलाकार म्हणून मला सांगावेसे वाटते कि त्यांच्या पक्षाने कायम मला मानाचीच वागणूक दिली आहे.
9. त्यांच्या घराच्या आसपास असलेल्या सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन प्रश्न ते त्यांच्या पक्षाच्या मदतीने सोडवत आले आहेत.
10.  शिवाजी पार्क ला जर तुम्ही दिवाळीच्या सुमारास गेला असाल तर त्यांच्या पक्षाने एक जागा निश्चित केली होती तिथे  या वर्षी काही हजार तरुण तरुणी येऊन दिवाळी एकत्रपणे साजरी करत होते.आणि पार अकरा बारा वाजे पर्यंत निर्धास्त पणे वावरत होते.

अमित ठाकरेंना मत का देऊ नये यावर संजय मोनेंनी म्हटलं की, 'आता अमित ठाकरेंना मत का देऊ नये याबद्दल खूप विचार करुनही मुद्दा सुचेना. पण तरीही तो शोधला. अमित ठाकरे अनुभवी नाहीत.पण तो आपणच त्यांना निवडून दिलं तर सहज मिळू शकेल.' 

ही बातमी वाचा : 

Mamata Mohandas Birthday: करियरच्या शिखरावर असताना त्वचेचा कॅन्सर, मग घटस्फोटही झाला, 55 पेक्षा अधिक हीट चित्रपट दिलेत या अभिनेत्रीनं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले

व्हिडीओ

Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Embed widget