Mamata Mohandas Birthday: करियरच्या शिखरावर असताना त्वचेचा कॅन्सर, मग घटस्फोटही झाला, 55 पेक्षा अधिक हीट चित्रपट दिलेत या अभिनेत्रीनं
मनोरंजनसृष्टीत एखाद्या अभिनेत्रीला नशीबाचा असा चकवा बसला तर वाट दिसेनाशी होईल. पण ममताच्या धीटपणाचं सगळीकडं मोठं कौतूक होतं.
Mamata Mohandas Birthday: अभिनय, गायन, मॉडेलिंग असं अष्टपैलू काम करत प्रेक्षकांना सौंदर्यासह आपल्या आपल्या व्यक्तीमत्वाची भुरळ घालणाऱ्या साऊथच्या लोकप्रीय अभिनेत्रीला करियरच्या शिखरावर असताना त्वचेचा कॅन्सर झाला. खासगी नातेसंबंधातही सगळं बिनसलं आणि काही दिवसांत घटस्फोट झाला. तब्बल ७ वर्ष प्रकृती अस्वास्थ्य, जड उपचार, भावनिक चढउतार आणि एकामागं एक येणाऱ्या संकटांना थोपवत ममता मोहनदास या मल्याळम सुपरस्टारनं स्वत:ला एवढं ताकदवान बनवलं की चाहत्यांसह अनेकांसाठी ती प्रेरणास्रोत ठरली.
मनोरंजनसृष्टीत एखाद्या अभिनेत्रीला नशीबाचा असा चकवा बसला तर वाट दिसेनाशी होईल. पण ममताच्या धीटपणाचं सगळीकडं मोठं कौतूक होतं. मल्याळम सिनेसृष्टीतली लाखोंची लाडकी ममता मोहनदास केवळ अभिनयातच नाही तर गायनातही आपल्या आवाजाची मोहिनी घालत आहे. 55 हून अधिक चित्रपट आणि ढीगभर हिट गाण्यांनी तिच्या कारकिर्दीला चार चाँद लावले आहेत. तामिळ-तेलुगू सिनेमांमध्येही दमदार छाप सोडलेली ममता आजही चाहत्यांच्या हृदयात घर करून आहे!
७ वर्षांचा कँसरविरुद्ध लढा
2009 साली ममताला हॉजकिन्स लिम्फोमा नावाच्या कॅन्सरचे निदान झाले. हा कॅन्सर मुख्यत्वे लसिकाजन्य (लिंफॅटिक) प्रणाली आणि रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम करतो. व्हिटिलिगो हा त्वचेचा आजार आहे ज्यामुळे त्वचेतील मूळ रंगद्रव्य, म्हणजेच मेलानिनची पातळी कमी होते. यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर पांढरे ठिपके किंवा डाग दिसू लागतात. हे डाग प्रामुख्याने हात, पाय, चेहरा आणि बाह्यांगांवर दिसतात.
लग्न झाले पण टिकले नाही, कँन्सरशी झुंझताना घटस्फोट
ममता मोहनदास यांना त्यांच्या चाहत्यांकडून नेहमीच एक प्रेरणादायक अभिनेत्री म्हणून गौरवले जाते. यामागे तिचा कॅन्सरविरुद्धचा संघर्ष आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यातील मोठे दुःख आहे. 2011 साली ममताने प्रजित पद्मनाभनसोबत विवाह केला होता. मात्र, काही कारणांमुळे त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही, आणि 2012 साली त्यांचा घटस्फोट झाला. कॅन्सरचा सामना, वैयक्तिक आयुष्यातील दुःख आणि प्रोफेशनल आव्हानं या सर्वांना सामोरे जात, ममताने स्वतःला सिद्ध केलं आहे. आजही तिचं नाव चित्रपटसृष्टीत मोठ्या आदराने घेतलं जातं, हे तिच्या कणखर व्यक्तिमत्त्वाचं चाहतेही कौतूक करताना दिसतात.