एक्स्प्लोर

sangharsh yodha Box Office Collection : संघर्षयोद्धा सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर संघर्ष? चार दिवसांत कमावले इतके लाख 

sangharsh yodha Box Office Collection :  संघर्षयोद्धा सिनेमाने मागील चार दिवसांमध्ये काही लाखांची कमाई केली आहे. 

sangharsh yodha Box Office Collection  :  मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर आधारित 'संघर्षयोद्धा' सिनेमा 14 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उभारलेला लढा या सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर साकारण्यात आला आहे. रोहन पाटील या सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका साकारत आहे. दरम्यान बॉक्स ऑफिसवर मात्र संघर्षयोद्धाचा प्रवास काहीश्या धीम्या गतीने सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. कारण चार दिवसांत या सिनेमाला 50 लाखांचाही टप्पा पार करता आलेला नाही. 

सॅनसिल्कच्या अहवालानुसार,  'संघर्षयोद्धा' या सिनेमाने पहिल्या चार दिवसांत 42 लाखांचा गल्ला जमावला. सॅनसिल्कच्या रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी या सिनेमाने 8 लाख रुपये, दुसऱ्या दिवशी 9 लाख रुपये, तिसऱ्या दिवशी 16 लाख रुपये आणि चौथ्या दिवशी 9 लाख रुपये इतकी कमाई केली. त्यामुळे प्रेक्षकांना या सिनेमाच्या गोष्टीचं स्वरुप आवडलं नाही का हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. 

संघर्षयोद्धा सिनेमाची रिलीज डेटही बदलली

मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करणारे दोन मराठी सिनेमे तयार झाले. त्यामधील संघर्षयोद्धा - मनोज जरांगे पाटील हा सिनेमा 14 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला. तसेच आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा हा सिनेमा येत्या 21 जून रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. संघर्षयोद्धा हा सिनेमा सुरुवातीला 21 जून रोजी प्रदर्शित होणार होता, पण निर्मात्यांनी या सिनेमाची तारीख बदलली आणि 14 जून रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्याच दिवशी आम्ही जरांगे हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार होता. पण संघर्षयोद्धामुळे आम्ही जरांगे सिनेमाची तारीख बदलण्यात तरीही. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर आठवडाभर आधी रिलीज होऊनही कमाई मात्र काही लाखांमध्येच असल्याचं पाहायला मिळतंय. 

संघर्षयोद्धाला आम्ही जरांगे सिनेमाचं आव्हान

येत्या शुक्रवारी म्हणजेच 21 जून रोजी आम्ही जरांगे हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे संघर्षयोद्धा सिनेमासाठी थेट स्पर्धक बॉक्स ऑफिसवर येईल. त्यानंतरही संघर्षयोद्धाचा प्रवास खडतर होईल की सिनेमा वरचढ ठरेल हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच. दरम्यान संघर्षयोद्धा सिनेमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या देखील भूमिका आहेत.            

ही बातमी वाचा : 

Marathi Movie Collection Alyad Palyad : मराठी बॉक्स ऑफिसवर गौरव मोरेच्या 'अल्लाड पल्याड'ने गाठला कोटींचा टप्पा, 'संघर्षयोद्धा'ने किती कमावले?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Embed widget