(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathi Movie Collection Alyad Palyad : मराठी बॉक्स ऑफिसवर गौरव मोरेच्या 'अल्लाड पल्याड'ने गाठला कोटींचा टप्पा, 'संघर्षयोद्धा'ने किती कमावले?
Marathi Movie Collection Alyad Palyad : मल्टिस्टारर असलेला हॉरर-कॉमेडी 'अल्याड पल्याड' चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. तर,
Marathi Movie Collection Alyad Palyad : बॉक्स ऑफिसवर सध्या 'मुंज्या' (Munjya Movie), चंदू चॅम्पियन (Chandu Champion) या चित्रपटाची जोरदार चलती सुरू आहे. तर, दुसरीकडे मराठी चित्रपटही दमदार कमाई करत आहे. मागील शुक्रवारी मराठी बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपट प्रदर्शित झाले. मल्टिस्टारर असलेला हॉरर-कॉमेडी 'अल्याड पल्याड' चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. 'अल्याड पल्याड'ने चारच दिवसात कोटीची कमाई केली आहे. आता चित्रपट दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकतो. तर, दुसरीकडे 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) या चित्रपटाने काही ठिकाणी जोर पकडला आहे. मात्र, अजूनही या चित्रपटाला मोठी कमाई करता आली नसल्याचे म्हटले जात आहे.
'मुंज्या' आणि 'चंदू चॅम्पियन' हे दोन हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपट 'अल्याड पल्याड'ही चांगली टक्कर देत आहे. मुंज्या हा हॉरर-कॉमेडी चित्रपट असून 'अल्याड पल्याड'ही त्याच धाटणीचा चित्रपट आहे. त्यामुळे तिकिटबारीवर हॉरर-कॉमेडीपटाचा बोलबाला असल्याचे दिसत आहे. 'अल्याड पल्याड' हा चित्रपट साधारणपणे 200 स्क्रिनवर झळकला होता. आता त्यात वाढ होत असून किमान 300 स्क्रिनवर झळकणार असल्याची माहिती आहे. 'अल्याड पल्याड' चित्रपटाने चार दिवसात 1 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता वाढलेल्या स्क्रिन आणि प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता कमाईत वाढ होईल असा अंदाज आहे.
View this post on Instagram
संघर्षयोद्धा चित्रपटाची किती कमाई?
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या जीवनपटावर आधारित 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सॅनसिल्कच्या रिपोर्टनुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी नऊ लाखांच्या जवळपास कमाई केली. दुसऱ्याही दिवशी सिनेमाची कमाई ही 8 ते 9 लाखांच्या आसपास राहिली. मागील दोन दिवसात चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली असून 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' या चित्रपटाने 30 ते 40 लाखांच्या घरात कमाई केली असल्याचे 'सॅनसिल्क'ने म्हटले आहे.