Sameer Vidwans : अतोनात पैशाच्या जोरावर ओंगळवाणा भडिमार..., निवडणुकीच्या वातावरणात दिग्दर्शक समीर विद्वंसची पोस्ट चर्चेत
Sameer Vidwans : अभिनेता दिग्दर्शक समीर विद्वंस याने नुकतच ट्वीटरवर केलेल्या एका पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहे.
Sameer Vidwans : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या एकच विषय वाजतोय, तो म्हणजे लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election 2024). उद्या म्हणजेच 16 मार्च रोजी निवडणूक आयोगाकडून (Election Comission) पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या काही तासांत लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. या निवडणुकांच्या वातावरणात एका मराठी दिग्दर्शकाची पोस्ट सध्या बरीच चर्चेत आलीये. अभिनेता आणि दिग्दर्शक समीर विद्वंस (Sameer Vidwans) याने केलेल्या एका ट्विटवर सध्या नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.
‘आनंदी गोपाळ’, ‘डबलसीट’, ‘टाईमप्लीज’, ‘क्लासमेट्स’, ‘लोकमान्य’, ‘लग्न पहावे करून’ अशा बऱ्याच चित्रपटांमधून समीरने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. समीर अनेकदा त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन सामाजिक आणि राजकीय विषयावरही भाष्य करत असतो. अशीच एक पोस्ट समीरने नुकतीच केली. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समीरच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय.
समीरने पोस्टमध्ये काय म्हटलं?
समीरने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर ही पोस्ट केलीये. त्यामध्ये त्याने म्हटलं की, 'सगळ्या FM चॅनल्सवरच्या कंटाळवाण्या जाहिराती पुढचे २, ३ महिने डोक्यात ही जाणार! सुरूवात तर झालेली आहेच. अतोनात पैशांच्या जोरावर ओंगळवाणा भडिमार…' त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. यामध्ये समीरने प्रामुख्याने ज्याकत्याक (IYKYK) असा शब्दप्रयोग केलाय. म्हणजेच ज्याला कळलं त्याला कळलं, असंच एक सूचक वक्तव्य समीरने केलंय.
सगळ्या FM चॅनल्सवरच्या कंटाळवाण्या जाहिराती पुढचे २,३ महिने डोक्यात ही जाणार!
— Sameer Vidwans । समीर विद्वांस (@sameervidwans) March 15, 2024
सुरूवात तर झालेली आहेच.
अतोनात पैशाच्या जोरावर ओंगळवाणा भडिमार..
ज्याकत्याक (IYKYK) 😉
समीरच्या कामाविषयी
समीरने बॉलीवूडमध्ये पदार्पण करत सत्य प्रेम की कथा या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची भूमिका सांभाळली आहे. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. तसेच समीरने आतापर्यंत अनेक पुरस्कारांवर नावं कोरली आहे. लोकसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम 16 मार्च रोजी जाहीर होणार. हा कार्यक्रम जाहीर होताच संपूर्ण देशात आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे समीरच्या या पोस्टची बरीच चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :