Somy Ali : सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीची पोस्ट चर्चेत; कोणाला म्हणाली, 'तु ज्यांचे शोषण केले....'
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून सोमीनं (Somy Ali) 'बॉलिवूडमधील हार्वे वेनस्टाईन' (Harvey Weinstein) ला वॉर्निंग मेसेज दिला आहे.
![Somy Ali : सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीची पोस्ट चर्चेत; कोणाला म्हणाली, 'तु ज्यांचे शोषण केले....' salman khan ex somy ali warns harvey weinstein of bollywood say women he abused will share the truth like aishwarya rai Somy Ali : सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीची पोस्ट चर्चेत; कोणाला म्हणाली, 'तु ज्यांचे शोषण केले....'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/30/657f7fe5ea21337ecd13093cf9534809_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Somy Ali : प्रसिद्ध अभिनेत्री सोमी अली (Somy Ali) सलमान खानसोबतच्या (Salman Khan) रिलेशनशिप मुळे चर्चेत होती. रिपोर्टनुसार, सलमान आणि तिचे नाते काही काळ टिकले पण नंतर त्यांचा ब्रेक-अप झाला. नुकतीच सोमी अलीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून सोमीनं 'बॉलिवूडमधील हार्वे वेनस्टाईन' (Harvey Weinstein) ला वॉर्निंग मेसेज दिला आहे.
सोमी अलीची पोस्ट
सोमीनं शेअर केलेल्या फोटो एक मुलगा आणि मुलगी दिसत आहेत. पण या दोघांचा चेहरा दिसत नाही. सोमीनं फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'बॉलीवूडचा हार्वे वेनस्टाईन! तुझं सत्य लोकांसमोर येईल. जसे ऐश्वर्या रायनं केले तसेच तु ज्या महिलांचे शोषण केले त्या एक दिवस बाहेर येतील आणि तुझं सत्य सांगतील.' पोस्टमध्ये सोमीनं उल्लेख केलेला बॉलीवूडचा हार्वे वेनस्टाईन हा नक्की कोण आहे? ते समजत नाही. काही नेटकऱ्यांनी कमेंट करून या बॉलीवूडच्या हार्वे वेनस्टाईनला ओळखण्याचा देखील प्रयत्न केला.
View this post on Instagram
कोण आहे हार्वे वेनस्टाईन?
हार्वे वेनस्टाईन हा अमेरिकन चित्रपट निर्माता आणि वासनांध( sex offender) आहे. हार्वे वेनस्टाईनचे मिरामॅक्स हे प्रोडक्शन हाऊस होते. त्यानं The Crying Game, Heavenly Creatures आणि Shakespeare in Love यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली.
महत्वाच्या बातम्या
- TOP 5 Bollywood Movies : कोरोनानंतर 'या' पाच सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कोट्यवधींची कमाई
- Happy Birthday Jackie Shroff : कधीकाळी चाळीत राहायचा जॅकी श्रॉफ, ‘अशी’ मिळाली मॉडेलिंगची ऑफर!
- Mika Singh : '... म्हणून मी 20 वर्षात लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या 150 मुलींना नकार दिला'; मिका सिंहनं सांगितलं कारण
- Nawazuddin Siddiqui : लग्झरी कारसोडून मुंबई लोकलमधून प्रवास; 'या' अभिनेत्याला ओळखलं का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)