Nawazuddin Siddiqui : लग्झरी कारसोडून मुंबई लोकलमधून प्रवास; 'या' अभिनेत्याला ओळखलं का?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हा अभिनेता मुंबई लोकलमधून प्रवास करताना दिसत आहे.
Nawazuddin Siddiqui : अनेक कलाकारांचे लग्झरी कारचे कलेक्शन असते. त्या गाड्यांमधून कलाकार प्रवास करतात. पण नुकत्याच एका अभिनेत्यानं चक्क लग्झरी कार सोडून मुंबईमधील लोकमधून प्रवास केला. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा काही आगामी चित्रपटांचे शूटिंग करत आहे. नवाजुद्दीनचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नवाजुद्दीन हा लोकल ट्रेनच्या प्लॅटफोर्मवर लोकलची वाट पाहाताना दिसत आहे. त्यानंतर तो लोकलमध्ये बसतो. नवाजुद्दीन हा मरून कलरचा टीशर्ट, ब्लॅक कलरचे ट्राउजर आणि व्हाईट कलरचा मास्क अशा लूकमध्ये दिसत आहे. ट्रॅफिकमधून प्रवास करण्यापेक्षा गाडीसोडून नवाजुद्दीननं लोकलमधून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट करत नवाजचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
एबीपीच्या 'एबीपी आयडियाज ऑफ इंडिया' या (ABP Ideas of India Summit 2022) कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मिरा रोडवरून लोकलमधून प्रवास केला, असं या कार्यक्रमामध्ये नवाजुद्दीन सांगतलं होतं. पाहा व्हिडीओ-
नवाझुद्दीन सिद्दीकीचा मुंबईत नवा बंगला
काही दिवासांपूर्वीच मुंबईतील नवाझुद्दीनच्या घराचं काम पूर्ण झालं आहे. नवाझुद्दीनने या घराचं नाव त्याच्या वडिलांच्या आठवणीत 'नवाब' असं ठेवलं आहे. नवाझुद्दीननं त्याच्या या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
महत्वाच्या बातम्या
- KGF Chapter 2 : यशने लिहिलेत 'KGF 2' सिनेमातील डायलॉग, दिग्दर्शकाने केला खुलासा
- RRR : राजामौलींचा 'आरआरआर' लवकरच होणार 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Sonali Bendre : ट्रोलर्स म्हणाले, 'रिअॅलिटी शोमधील इमोशनल स्टोरी फेक'; सोनाली बेंद्रेनं दिलं सडेतोड उत्तर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha