एक्स्प्लोर

35 Years Of Salman Khan : बाॅलिवूडचा भाईजान सलमान खानच्या फिल्मी करिअरला 35 वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर चाहत्यांचे आभार मानत शेअर केला व्हि़डीओ

अभिनय विश्वात तब्बल 35 वर्षांचा प्रवास पूर्ण केल्याबद्दल  सलमान खानने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. चित्रपटातील सीन एकत्रित करून आपल्या चाहत्यांकरता सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे,

35 Years Of Salman Khan : बाॅलिवूडचा (Bollywood) भाईजान सलमान खानने काल (26 ऑगस्ट) बॉलिवूडमध्ये 35 वर्षे पूर्ण केली आहेत. "बिवी हो तो ऐसी" या चित्रपटातून त्याने 1988 मध्ये बाॅलिवूडमध्ये एंट्री केली. त्याने त्याच्या चाहत्यांचे त्यानंतर अनेक चित्रपटातून मनोरंजन केले. त्यामध्ये मैंने प्यार किया, बागी, ​​सनम बेवफा, पत्थर के फूल, साजन, मुझसे शादी करोगी, चुपके चुपके, करण-अर्जुन या चित्रपटात दिसला. 

अभिनय विश्वात तब्बल 35 वर्षांचा प्रवास पूर्ण केल्याबद्दल सलमान खानने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. सलमानने त्याच्या काही फेमस चित्रपटातील सीन एकत्रित करुन आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याखाली त्याने कॅप्शन लिहिले आहे, "35 वर्षे 35 दिवसांसारखी वाटली. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार."

सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका व्यक्तीने कमेंट केली- "येथे दुसरा सलमान खान कधीच असू शकत नाही." आणखी एका चाहत्याने लिहिले की, "मी म्हातारा झालो तरी सलमान खान नेहमीच माझा आवडता राहिल." याशिवाय एका फॅनने लिहिले की 'बॉलिवूड इंडस्ट्रीत 35 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन आणि आमचे मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद."

View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Salman Khan Upcoming Project)

सलमान खान बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आहे. नुकतंच त्याने 'बिग बॉस ओटीटी 2'चं (Bigg Boss OTT 2) शूटिंग पूर्ण केलं आहे. आता अभिनेत्याच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki jaan) या सिनेमात अभिनेता शेवटचा झळकला होता. सलमान खानचा 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या सिनेमात तो बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय इमरान हाश्मी, विशाल जेठवा आणि रिद्धी डोगराही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. सलमानचा 'टायगर 3' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवणार असं म्हटलं जात आहे. या सिनेमात शाहरुख खानची (Shah Rukh Khan) झलक पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'टायगर 3'सह सूरज बडजात्याच्या 'प्रेम की शादी' या सिनेमातही तो झळकणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Sushant Singh Rajput Flat : सुशांत सिंह राजपूतने आयुष्य संपवलेला 'तो' फ्लॅट बॉलिवूड अभिनेत्रीने घेतला विकत; तीन वर्षांपासून होता बंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PMAnandache Paan : माणूस 'असा' का वागतो? पुस्तकाच्या लेखिका Anjali Chipalkatti यांच्यासोबत खास गप्पाBhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget