(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Saleel Kulkarni : विराट,हार्दीकला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं, सूर्याच्या कॅचचं भरभरुन कौतुक; टीम इंडियाच्या कामगिरीवर सलील कुलकर्णींचं विजयी विश्लेषण
Saleel Kulkarni : सलील कुलकर्णी यांनी भारतीयांनी वर्ल्डकप जिंकल्यानंतर सलील कुलकर्णी यांनी त्याचं विश्लेषण केलं आहे.
Saleel Kulkarni : विश्वविजेत्या (T20 World Cup) भारतीय संघाचं सध्या संपूर्ण जगभरातून भरभरुन कौतुक केलं जातंय. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत खिळवून ठेवणारी मॅच अखेर भारतीय संघाने आपल्या बाजूने झुकवलीच. त्यानंतर भारतीयांचा आनंद हा गगनात मावेनासा झालाय. देशाच्या पंतप्रधानांपासून ते अगदी समान्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात अभिमानास्पद भावना होत्या. अनेक मराठी कलाकारांनी देखील टीम इंडियाचं कौतुक केलं. गायक सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) यांनी या सामन्याचं विश्लेषण करत यावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सलील कुलकर्णी यांनी सुरुवातीपासून भारताच्या प्रत्येक सामन्याचं विश्लेषण केलं होतं. तसंच त्यांनी अंतिम सामन्यांचही विश्लेषण केलं. भारतीय संघाने सात धावांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघावर दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या या यशामुळे भारतीयांच्या माना अभिमानाने उंचावल्या. वनडे विश्वचषक थोडक्यात हुकल्यानंतर टी-20 विश्वचषक मात्र भारतीयांनी अगदी सहज आपल्या नावावार केला.
सलील कुलकर्णी यांनी काय म्हटलं?
सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये म्हटलं की, नमस्कार, सगळ्या खऱ्या खऱ्या क्रिकेटवेड्यांचं प्रचंड अभिनंदन. आपण वर्ल्डकप जिंकलो आहोत आणि या वर्ल्डकपच्या पहिल्या दिवसापासून आपण गप्पा मारतोय. काय एक एक मॅचेस झाल्या आहेत. सुरुवातीपासून आपण प्रत्येक सामना जिंकत जिंकत आलो आणि आता वर्ल्डकपही जिंकलो आहोत. रोहित शर्मा, राहुल द्रविड या सगळ्यांचं अत्यंत मनापासून अभिनंदन. विराट कोहली कालची जी इनिंग खेळला, त्याने परत एकदा दाखवलं, तो का किंग कोहली आहे. मोठ्या स्टेजवर मोठा माणूस गातो, तसा तो काल खेळला. पंड्या म्हणजे आपल्याला खरंतर या दोघांविषयी वाईट वाटायला पाहिजे. ज्या पद्धतीने या दोघांना ट्रोल केलं गेलं किंवा उगीच ती पाच मिनिटं सामना पाहिला आणि कोहलीपण बाहेरून बघतो वगैरे. हे ना मोठ्या खेळाडूंविषयी बोलताना विचार करायला पाहिजे. ही खूप मोठी आणि कष्ट केलेली माणसं आहेत. योग्य वेळेला ते दाखवून देतात.
पुढे त्यांनी म्हटलं की, अक्षर पटेलचीही आजही इनिंग कमालीची होती. खूप चढ-उतार होते, सुरुवातीच्या दोन ओव्हर मस्त गेल्या. पण लागोपठ तीन विकेट्स गेल्या आणि सगळ्यांच्या पोटात गोळा आला. पण त्यानंतर अक्षर पटेल मस्त खेळला आणि मज्जा आली. स्कोअर देखील मस्त झाला होता. त्यामुळे असं वाटलं होतं की, आपल्याला आता उत्तम संधी आहे. पण क्लासेन आणि मिलर खूप मारत होते. डिकॉकही मारत होता. मात्र सुर्याचा कालचा कॅच पाहून मला असं वाटलं की, तो 83 च्या कपिल देव यांच्या कॅच इतकाच सगळ्यांच्या लक्षात राहिल. त्यानंतर पंड्या आणि बुमराह जादूगार आहेत. बुमराह हॅट्स ऑफ… सॅल्यूट. रोहित शर्मा व्ही आर लव्ह यू…पंड्या व्ही आर लव्ह यू… कोहली तू किंग आहेस.
View this post on Instagram