Sagar Karande Cyber Crime Case: सागर कारंडेला 61 लाखांचा चुना लावणाऱ्या भामट्याला पोलिसांनी पकडलं; पण सर्व पैसे...
Sagar Karande Cyber Crime Case: सागर कारंडेला एक लाईक करा आणि पैसे कमवा या स्किमला सागर कारंडे बळी पडला आणि 61 लाखांचा फटका बसलेला. त्यानंतर सागर कारंडेनं तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती.

Sagar Karande Cyber Crime Case: इतरांना आपल्या विनोदानं हसवून डोळ्यांत पाणी आणणारा 'चला हवा येऊन द्या फेम' (Chala Hawa Yeu Dya) सागर कारंडे (Sagar Karande) काही दिवसांपूर्वी सायबर क्राईमचा (Cyber Crime) शिकार झालेला. याप्रकरणात त्यानं पोलिसांत धाव घेतली होती. आता अखेर पोलिसांनी सागर कारंडेला फसवणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अक्षयकुमार गोपलन असं सागर कारंडेची फसवणूक करणाऱ्या आरोपीचं नाव असून आरोपीला सायबर पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे.
आरोपी सापडला, पैशांचं काय?
सागर कारंडेला एक लाईक करा आणि पैसे कमवा या स्किमला सागर कारंडे बळी पडला आणि 61 लाखांचा फटका बसलेला. त्यानंतर सागर कारंडेनं तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं हलवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली, त्यावेळी आरोपीने क्रिप्टो करन्सी खरेदी करून सागर कारंडेकडून उकळलेले सगळे पैसे खर्च केल्याचं समोर आलं आहे. तसेच, केवळ सागर कारंडेच नाहीतर आरोपीनं इतरही अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती मिळाली आहे.
प्रकरण नेमकं काय?
काही दिवसांपूर्वी अभिनेता सागर कारंडेला एका महिलेनं व्हॉट्स अॅपवर एक लिंक पाठवली होती. ज्यामध्ये त्याला इन्स्टाग्राम पेज लाईक केल्यानंतर पैसे मिळतील, असं सांगितलं होतं. तसेच, प्रत्येक लिंकमागे प्रत्येकी 150 रुपये देण्याचं आमीष दाखवण्यात आलं होतं. अभिनेता महिलेच्या जाळ्यात अडकला. सुरुवातीला त्याला एका पेजला लाईक करण्यासाठी 150 रुपये देण्याचं आश्वासन दिलं गेलं. महिलेनं सागरला सुरुवातीला काही पेजच्या लिंक पाठवून त्याला लाईक करायला सांगितलं. सागरनं ते पेज लाईक केल्यानंतर त्याला त्याबदल्यात पैसे दिले गेले. सागर जाळ्यात अडकलाय हे कळताच सायबर भामट्यांनी पुढचं जाळं टाकलं.
सायबर भामट्यांनी सागरला गुंतवणुकीची स्किम देऊ केली. त्यानुसार सागरनं सुरुवातीला 27 लाख गुंतवले. काही काळानं अभिनेत्यानं पैसे काढण्याचाही प्रयत्न केला, पण त्याला सायबर चोरट्यांनी टास्क पूर्ण झाल्यावर पैसे पूर्ण मिळतील असं आश्वासन दिलं. पुढे सायबर चोरट्यांनी 80 टक्के काम झालेलं आहे. यात आणखी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असं सांगितलं. त्यानंतर त्या अभिनेत्यानं 19 लाख आणि त्यावर 30 टक्के कर भरला. अशी एकूण 61 लाख 83 हजारांची गुंतवणूक केली. कालांतरानं आपली फसवणूक झाल्याचं समजताच सागर कारंडेनं तात्काळ पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.
दरम्यान, सागर कारंडेनं केलेल्या गुंतवणूकीतून 4 लाख 59 हजार आरोपी अक्षयनं आपल्या मित्राच्या खात्यातून रोखीनं काढले. त्याचं Crypto चलन आंतरराष्ट्रीय बाजारात खेरेदी आणि विक्री करून नमूद रकमेची विल्हेवाट लावल्याचं पोलीस तपासांत समोर आलं आहे. आरोपीनं यापूर्वीही अशा अनेकांना फसवल्याचंही तपासात समोर आलं आहे. तसेच, आरोपी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर गुन्हेगार असल्याचंही समोर आलं आहे.
पाहा व्हिडीओ : Cyber Fraud Sagar Karande : सागर कारंडेची 61 लाखांची फसवणूक करण्याऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक
महत्त्वाच्या इतर बातम्या :























