Rinku Rajguru: 'मी टिपिकल बाईसारखी...'; रिंकू राजगुरूचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, 'देवपूजा... स्वयंपाक...'
Rinku Rajguru: नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना रिंकू राजगुरून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि घरकामाबाबत काही खास गोष्टी सांगितल्या. ज्यामुळे सध्या चर्चा सुरू आहेत.

Rinku Rajguru: अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 'सैराट' (Sairat) या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री घराघरांत पोहोचली आहे. पहिल्या सिनेमाने अभिनेत्री ब्रेक मिळाला. या सिनेमात तिने साकारलेली आर्चीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतरही रिंकून वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधून स्वतःला सिद्ध केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना रिंकू राजगुरून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि घरकामाबाबत काही खास गोष्टी सांगितल्या. ज्यामुळे सध्या चर्चा सुरू आहेत.
नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रिंकू म्हणाली की, "मी टिपिकल बाईसारखी आहे. घरातील कामं करायला मला आवडतात." रिंकू म्हणाली की, "माझी देवपूजा मी करते, माझा स्वयंपाक मी करते. मला घर स्वच्छ लागतं... कामात बिझी असल्यामुळे दररोज सगळी कामं करणं शक्य नसलं तरीसुद्धा दररोज स्वयंपाक मात्र तिला स्वतःच्या हातानं करायला आवडतो..."
View this post on Instagram
"एवढं रोज होत नाही. त्याच्यामुळे काही गोष्टींसाठी आपल्याकडे आपल्या ताई येतात कामाला, पण स्वयंपाक नाही मला कोणाच्या हातचा आवडत... नॉनव्हेज सोडून सगळंच येतं. मी भाकरी छान करते, पिठलं छान करते. पुरणपोळ्या थोड्या थोड्या जमतात. तर जेवण मला काय सोप्पं आहे. ते काय अवघड नाहीये एवढं...", असं रिंकू म्हणाली.
रिंकू राजगुरूची घराबाबतची आत्मियता, स्वयंपाकाबाबतचं प्रेम आणि नीटनेटकेपणा तिचा साधेपणा आणि शिस्त दाखवतो. यामुळे चाहत्यांकडून रिंकूवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. कामातून वेळ काढून घरची जबाबदारी आणि स्वतःची आवड जपणाऱ्या रिंकूचं कौतुक केलं जात आहे. तसेच, एवढी प्रसिद्धी मिळूनही रिंकूनं आपले पाय जमीनीवरच ठेवलेत, असंही चाहते म्हणत आहेत.
दरम्यान, 'सैराट' सिनेमानंतर आर्ची म्हणजे, रिंकू राजगुरू अनेकांच्या गळ्यातील ताईत झाली. सैराटनंतर रिंकूनं अनेक प्रोजेक्ट्स केले. 'कागर', 'झिम्मा 2', 'मेकअप', 'आठवा रंग प्रेमाचा' यांसारख्या सिनेमांमध्ये दिसली. तसेच, सध्या ती अनेक नव्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























