Rekha,Vinod Mehra : ...जेव्हा विनोद मेहराच्या आईनं रेखा यांना मारायला उगारली चप्पल; 'तो' किस्सा माहितीये?
Rekha, Vinod Mehra : रेखा यांचे लग्न प्रसिद्ध अभिनेते विनोद मेहरा (Vinod Mehra) यांच्यासोबत झाले होते.
Rekha,Vinod Mehra : अभिनेत्री रेखा (Rekha) या अभिनयाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. रिपोर्टनुसार, रेखा यांचे लग्न प्रसिद्ध अभिनेते विनोद मेहरा (Vinod Mehra) यांच्यासोबत झाले होते. विनोद मेहरा यांची चार लग्न झाली होती. त्यांचे पहिली लग्न हे मीना ब्रोका यांच्यासोबत झाले होते. त्यांच्या आईच्या इच्छेने त्यांनी मीना यांच्यासोबत लग्न केले होते. पण नंतर मीना आणि विनोद यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
मीना यांच्यासोबत लग्न केल्यानंतर विनोद मेहरा यांच्या आयुष्यात बिंदिया गोस्वामी यांची एन्ट्री झाली. रिपोर्टनुसार, विनोद यांच्या करिअमध्ये तेव्हा उतरता काळ सुरू होता. त्यामुळे बिंदीया आणि विनोद यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर बिंदिया यांनी विनोद यांच्यासोबत घटस्फोट घेऊन जे.पी. दत्ता यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.
विनोद मेहरा यांनी तिसरे लग्न अभिनेत्री रेखा यांच्यासोबत केलं. जेव्हा लग्न झाल्यानंतर रेखा या पहिल्यांदा विनोद यांच्या घरी त्यांच्या आईला भेटायला गेल्या तेव्हा एक किस्सा घडला. रेखा यांनी विनोद मेहरा यांच्या आईचा आशीर्वाद घेतला तेव्हा त्यांच्या आईनं रेखा यांना मारायला चप्पल हातात घेतली. कारण विनोद यांच्या आईला रेखा या सून म्हणून पसंत नव्हत्या. या गोष्टीमुळे रेखा यांना धक्का बसला. त्यामुळे रेखा आणि विनोद यांचे नाते फार काळ टिकले नाही. विनोद मेहरा यांचे वयाच्या 45 व्या वर्षी ह्रदय विकाराच्या झटक्यानं निधन झाले.
हेही वाचा :
- Happy Birthday Rohini Hattangadi : हा तर योगायोगच! पडद्यावर ‘कस्तुरबा’ साकारणाऱ्या रोहिणी हट्टंगडींचं खऱ्या आयुष्यातही गांधींशी खास कनेक्शन!
- Adipurush : ‘रामनवमी’च्या निमित्ताने दिसला प्रभासचा ‘राम’ अवतार, ‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शकाने शेअर केला खास व्हिडीओ!
- Dasvi Twitter Review : अभिषेक बच्चनच्या ‘दसवीं’ला प्रेक्षकांनी केलं ‘पास’! सोशल मीडियावरही चित्रपटाची हवा!
- Ranbir-Alia Wedding Preparations: रणवीर-आलियाच्या लग्नाची लगबग, कपूर घराण्याचा ‘आरके’ स्टुडिओ नववधूप्रमाणे सजला!