एक्स्प्लोर

Ranbir-Alia Wedding Preparations: रणवीर-आलियाच्या लग्नाची लगबग, कपूर घराण्याचा ‘आरके’ स्टुडिओ नववधूप्रमाणे सजला!

Ranbir-Alia Wedding : रणबीर आणि आलिया 17 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.

Ranbir-Alia Wedding : बॉलिवूडचं स्टार कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लवकरच लग्नबंधनात अडकणार असून त्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. चेंबूर येथील आरके स्टुडिओचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या संपूर्ण स्टुडिओला रोषणाई करण्यात आली आहे. स्टुडिओ इमारतीसह झाडांवर या लाईट्स लावण्यात आल्या आहेत.

आरके स्टुडिओसह रणबीर कपूरच्या घराचा कृष्णराज बंगलाही आज सकाळी सजवण्यात आला आहे. खरंच आलिया-रणबीरचं लग्न होत आहे की, नाही याला अद्याप कुटुंबातील कोणत्याही सदस्याने दुजोरा दिलेला नाही. परंतु, आज सकाळपासून घरांवर केलेली सजावट पाहता लग्नाची तयारी सुरू झाली आहे, असे म्हणता येईल.

याआधी रविवारी, रणबीर कपूरचे वांद्रे येथील नवीन बांधकाम सुरू असलेले घर देखील रोषणाईने सजले होते. सध्या बांधकाम सुरू असलेल्या ‘कृष्णा राज’ बंगल्याच्या अनेक व्हिडीओंमध्ये कामगार एलईडी स्ट्रिंग लाईट्सने बंगला सजवताना दिसत आहेत. बांधकाम कुठवर आलंय हे तपासण्यासाठी रणबीर, आलिया आणि नीतू कपूर यांनी यापूर्वी अनेकदा या ठिकाणी भेट दिली होती.

सर्वांना माहीत आहे की, रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली असून, प्रत्येक दिवसागणिक लग्नाबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. पाहुण्यांच्या यादीपासून ते स्थळापर्यंत सर्वच गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

तारखेची अद्याप पुष्टी झालेली नसली, तरी यापूर्वी रणबीरने स्वतः लग्नाबाबत बोलण्यास होकार दिला होता. रणबीर आणि आलिया 17 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. त्याच वेळी, या जोडप्याच्या लग्नाचे इतर सोहळे 14 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. लग्नसोहळा सुरू होण्यापूर्वी दोघांची घरे सजवली जाणार आहेत. लग्नासाठी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित केले जात आहे. त्याचबरोबर लग्नानंतर आलिया आणि रणबीर मित्र आणि इंडस्ट्रीतील लोकांना ग्रँड रिसेप्शन पार्टी देणार आहेत. रणबीर आणि आलिया त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. 2018 मध्ये सोनम कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये या दोघांनी एकत्र उपस्थिती दर्शविली होती.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actor Aabhijeet Kelkar Facebook Post: मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, 'माझ्या जीवाला धोका...' ; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, 'माझ्या जीवाला धोका...' ; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
Sanjay Gupta Passes away: संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
Filmmaker Sanjay Gupta Death: संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
Filmmaker Sanjay Gupta Passed Away: बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, 'शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
मोठी बातमी : बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Punjab AAP Candidate List: आपकडून पंजाबमध्ये 40 उमेदवारांची घोषणा, मुख्यमंत्री भगवंत मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार; तुरुंगवासी मंत्र्यालाही तिकीट
आपकडून पंजाबमध्ये 40 उमेदवारांची घोषणा, मुख्यमंत्री भगवंत मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार; तुरुंगवासी मंत्र्यालाही तिकीट
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार, 35 दिवसांचा राज्यव्यापी दौरा, 10 लाख लोकांपर्यंत पोहोचणार, आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार,राज्यव्यापी दौऱ्यात आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
Eknath Shinde Shivsena: महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
Pune Crime News : मुलाला माझी आठवण येत राहिली असती, म्हणून त्यालाही सोबत नेतेय; पुण्यातील विवाहितेने आयुष्य संपवण्याचं कारण चिठ्ठीत लिहिलेलं, मुलासह 18 व्या मजल्यावर गेली अन्...
मुलाला माझी आठवण येत राहिली असती, म्हणून त्यालाही सोबत नेतेय; पुण्यातील विवाहितेने आयुष्य संपवण्याचं कारण चिठ्ठीत लिहिलेलं, मुलासह 18 व्या मजल्यावर गेली अन्...
Rohit Pawar Ujani Dam: पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा
पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा
RBI Polymer Notes: आरबीआय 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात कधीपासून आणणार? मोठी अपडेट समोर 
आरबीआय 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात कधीपासून आणणार? मोठी अपडेट समोर 
पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; आठ जण जखमी, तीन महिलांचा समावेश, आमदारांनी दिली माहिती
पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; आठ जण जखमी, तीन महिलांचा समावेश, आमदारांनी दिली माहिती
Bhiwandi News: भिवंडीतील खावडा वीज प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्या; सुमित बाळ्या मामा म्हात्रे यांची मागणी
भिवंडीतील खावडा वीज प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्या; सुमित बाळ्या मामा म्हात्रे यांची मागणी
Embed widget