RJ Mahvash Shares Insta Post: खोटेपणा, लोभ अन् कपट... RJ महावशचे धनश्रीला टोमणे? चहलकडून 4.5 कोटी पोटगी मागितल्यानंतर 'ही' पोस्ट आली समोर
RJ Mahvash Shares Insta Post: फोटोमध्ये तिनं रेड हार्ट्स असलेल्या पांढऱ्या रंगाच्या टी-शर्ट ड्रेसमध्ये दिसून आली. तसेच, त्यासोबतच तिनं ब्लॅक बेल्टही मॅच केला आहे. त्यासोबतच तिनं हाय पोनीटेल लूक केला आहे. पण, सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय ते तिच्या कॅप्शननं.

RJ Mahvash Shares Insta Post: सध्या युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), धनश्री वर्मा (Dhanashree Verma) घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. एकीकडे धनश्रीसोबतचा घटस्फोट आणि दुसरीकडे वारंवार आरजे महावशसोबत स्पॉट झाल्यामुळे युजवेंद्र चहलचं नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अशातच नुकतंच चहलन धनश्रीला 4.5 कोटींची पोटगी देण्यास समती दर्शवल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्याचदरम्यान, आरजे महावशनं (RJ Mahavash) आपल्या इन्स्टा हँडलवर काही क्लासी फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये तिनं रेड हार्ट्स असलेल्या पांढऱ्या रंगाच्या टी-शर्ट ड्रेसमध्ये दिसून आली. तसेच, त्यासोबतच तिनं ब्लॅक बेल्टही मॅच केला आहे. त्यासोबतच तिनं हाय पोनीटेल लूक केला आहे. पण, सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय ते तिच्या कॅप्शननं.
आरजे महावशनं लिहिलंय की, "झूठ, लालच और फरेब से परे हैं..खुदा का शुक्र है आज भी खड़े हैं..." महावशनं पोस्ट करताच तिची पोस्ट व्हायरल झाली. पोस्ट केल्याकेल्या युजवेंद्र चहलचं लाईकही आलं. हे सर्व त्यांच्या नजरेतून सुटेल ते नेटकरी कसले. एकानं म्हटलंय की, चहलनं फक्त 10 सेकंदातच लाईक केलंय. आणखी एका युजरनं गमतीनं म्हटलं की, चहलचं आता आयपीएलमधलं कमबॅक पाहाच... आणखी एकानं म्हटलंय की, पोस्ट अपलोड होताच चहलनं सर्वात आधी लाईक केलंय.
आरजे महवशची नवी पोस्ट व्हायरल
काही दिवसांपूर्वी धनश्रीनं चहलकडून 60 कोटींची पोटगी मागितल्याचं समोर आलं होतं. धनश्रीच्या कुटुंबानं त्याचं खंडन केलं आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्या वृत्ताचं खंडन केलं. धनश्रीचे कुटुंबीय म्हणाले होते की, "पोटगीबाबतच्या निराधार दाव्यांमुळे आम्ही नाराज आहोत. आम्ही स्पष्ट करतो की, एवढी मोठी रक्कम कधीच मागितली गेलेली नव्हती. या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही."
धनश्री, चहल गेल्या एक वर्षापासून वेगळे राहतात
चहल आणि धनश्री वर्मा यांचं लग्न 2020 मध्ये झालेलं. ते जवळजवळ एक वर्षांपासून वेगळे राहतात. त्यांच्या घटस्फोटाचा निर्णय 20 मार्च रोजी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जनतेची उत्सुकता वाढली आहे. तसेच, आरजे महवशसोबत सुरू असलेल्या बातम्यांवर दोघांपैकी कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

