![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Marathi Movie : पुनीत बालन स्टुडिओ निर्मित पहिला मराठी सिनेमा, 'रानटी' सिनेमाच टीझर रिलीज
Marathi Movie : रानटी सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.
![Marathi Movie : पुनीत बालन स्टुडिओ निर्मित पहिला मराठी सिनेमा, 'रानटी' सिनेमाच टीझर रिलीज Ranati Marathi Movie Punit Balan Produce Sharad Kelkar Entertainment news in marathi Marathi Movie : पुनीत बालन स्टुडिओ निर्मित पहिला मराठी सिनेमा, 'रानटी' सिनेमाच टीझर रिलीज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/26/9c7f24b1c487ab2f7282bd5c77f022891729942280189720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Marathi Movie : पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ (Marathi Movie) या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या विष्णूचा रौद्र अवतार दाखविणाऱ्या ‘रानटी’ चित्रपटाच्या टिझरमधून अॅक्शन, ड्रामा आणि इमोशन्स पाहायला मिळणार आहेत. अभिनेता शरद केळकर यांच्यासह अनेक कलाकारांचा जबरदस्त 'रानटी' अंदाज यात दिसतोय.
पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट असणार आहे. आपल्या खलनायकी अवताराने सर्वांचा थरकाप उडवणारे बॉलीवूडचे सुप्रसिद्ध ‘रानटी’ खलनायक जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांनीसुद्धा दिग्दर्शिक समित कक्कड च्या ‘रानटी' चित्रपटाच्या दमदार टिझरची झलक सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे.
या दिवशी येणार सिनेमा भेटीला
'अपून फूल ऑन डेंजर.. डोन्ट टेक मी लाइट' अशा दमदार डायलॉगने अवतरलेला ‘विष्णू’ हा बेरकी आणि कपटी व्हिलनला स्वतःच्या शक्ती आणि युक्तीने अद्दल घडवताना दिसणार आहे. अॅक्शनच्या जोडीला इमोशन आणि रोमान्सच्या साथीने खुलत जाणारा कथेतला ड्रामा असं एक ‘सुपर पॅकेज’ असलेला पॉवरफुल अॅक्शनपट ‘रानटी’ येत्या 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
लेखनापासून ते अभिनयापर्यंत आणि निर्मितीमूल्यांपासून सादरीकरणापर्यंत सर्वच पातळीवर दिग्दर्शक समित कक्कडचे सर्व चित्रपट लक्षवेधी राहिले आहेत. ‘रानटी’ च्या निमित्ताने मराठीत भव्य अॅक्शनपट घेऊन आले आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासून त्यातील वेगळेपणा आणि भव्यता दिसून अली आहे. ‘रानटी’चा टीझर पाहताना सर्वांच्याच अंगावर अक्षरशःकाटे येतात. हा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे.पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला मोठा अॅक्शनपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)