पहिल्या भेटीतच साऊथ अभिनेत्याकडून पायाला चुकीचा स्पर्श; राधिका आपटेने जागेवर कानशिलात लगावली
Radhika Apte : पहिल्या भेटीतच साऊथ अभिनेत्यानकडून पायाला चुकीचा स्पर्श; राधिका आपटेने जागेवर कानशिलात लगावली

Radhika Apte : आज आपण ‘पॅडमॅन’ आणि ‘मांझी द माउंटनमॅन’ सारख्या चित्रपटांमधील अभिनयामुळे आपली छाप सोडणाऱ्या अभिनेत्री राधिका आपटे हिच्याबद्दल बोलत आहोत. तिच्या प्रत्येक चित्रपटाला आणि वेब सिरीजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. पण तुम्हाला ठाऊक आहे का, एकदा सेटवर राधिकाने एका साऊथ अभिनेत्याला चक्क जोरदार कानशिलात लगावली होती. काय होती त्यामागची कारणं ते जाणून घेऊया...
ही घटना त्या काळातील आहे, जेव्हा राधिका एका तमिळ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. स्वतः राधिकाने एका मुलाखतीत या घटनेचा उल्लेख केला होता. तिने सांगितले होते की, एका दिवशी मी सेटवर एका अभिनेत्याला चापट मारली होती. राधिकाने स्पष्ट केलं की, त्या दिवशी त्या सेटवर शूटिंग करत असताना त्या साऊथ अभिनेत्याने अचानक तिच्या पायाला गुदगुल्या करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे मला एवढा राग आला की, मी थेट त्याच्या गालावर चापट मारली.
याशिवाय राधिकाने हेही सांगितले की, त्या दिवशी त्या अभिनेत्याला त्या पहिल्यांदाच भेटल्या होत्या आणि त्यांना अजिबात ओळखत नव्हत्या. त्यामुळे अशा प्रकारची वागणूक त्यांनी सहन केली नाही.
View this post on Instagram
हेही सांगितलं जातं की, राधिकाने ‘अहल्या’ आणि ‘बदलापुर’ सारख्या चित्रपटांमध्ये अनेक इंटीमेट सीन दिले होते. त्यानंतर त्यांना अडल्ट चित्रपटांचे ऑफर येऊ लागले आणि त्यामुळे त्या खूप त्रस्त झाल्या. फक्त चित्रपटांमध्येच नाही तर ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘घुल’ सारख्या वेब सिरीजमध्येसुद्धा राधिकाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. करिअरबद्दल बोलायचं झालं तर राधिकाच्या अभिनय प्रवासाची सुरुवात 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातील छोट्याशा भूमिकेतून झाली होती. यानंतर मागे वळून न पाहता राधिकाने ‘शोर इन द सिटी’, ‘रक्त चरित्र’, ‘द वेटिंग रूम’ आणि ‘आय अॅम’ यांसारख्या हिंदी चित्रपटांसह तमिळ, तेलुगू आणि मराठी चित्रपटांतही काम केलं.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
जत्रा : ह्यालागाड-त्यालागाड सिनेमाची टीम पुन्हा एकत्र; कोंबडी पळाली गाण्यावर भन्नाट डान्स
दोन मर्डर केलेल्या व्यक्तीसोबत संजय दत्तने केलं होतं काम; तुरुंगात राहूनही पैसे कमवायचा























