Who Is Rachel Gupta : 20 वर्षीय तरुणीने रचला इतिहास, मिस इंडिया ग्रँड इंटरनॅशनलचं मुकुट जिंकणारी पहिली भारतीय, कोण आहे रचेल गुप्ता?
Who Is Rachel Gupta : रचेल गुप्ता हिने 'मिस ग्रँड इंटरनॅशनल' जिंकून भारतासाठी इतिहास रचला आहे. हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय आहे.
Miss Grand International 2024 : भारतीय तरुणी रचेल गुप्ता हिने 'मिस ग्रँड इंटरनेशनल' स्पर्धा जिंकून नवा इतिहास रचला आहे. हा किताब पटकावणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. रचेल गुप्ता हिने देशासाठी नाव जागतिक स्तरावर बहुमान मिळवला आहे. 25 ऑक्टोबर रोजी रचेन गुप्ता पहिली भारतीय मिस ग्रँड इंटरनेशनल ठरली आहे. हे ब्युटी पेजंट जिंकून तिने भारताच्या इतिहासात नवं सोनेरी पान चिकटवलं आहे. थायलँडमध्ये आयोजित या स्पर्धेत तिने बाजी मारली आहे.
20 वर्षीय तरुणीने रचला इतिहास
रचेल गुप्ताने 'मिस ग्रँड इंटरनेशनल' सौंदर्य स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 77 देशांतील सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये रचेल वरचढ ठरली. गेल्या वर्षी 'मिस ग्रँड इंटरनेशनल' विजेती लुसियाना फस्टर हिने रचेल गुप्ताला मुकुट घातला. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. 20 वर्षीय रेचलने या मुकुटासह एक विशेष कामगिरी केली आहे. 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भारताने 'मिस ग्रँड इंटरनॅशनल'चा किताब पटकावला आहे.
मिस इंडिया ग्रँड इंटरनॅशनलचं मुकुट जिंकणारी पहिली भारतीय
View this post on Instagram
11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताकडे किताब
20 वर्षीय रेचल गुप्ताने या मुकुटासह एक विशेष कामगिरी केली आहे. 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भारताने 'मिस ग्रँड इंटरनॅशनल'चा किताब पटकावला आहे. 2013 पासून ही स्पर्धा आयोजित केली जाते. ज्यामध्ये भारतीय सुंदरीने पहिल्यांदाच किताब पटकावला आहे. पंजाबची रचेल गुप्ता यंदा मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 मुकुटाची विजेती ठरली आहे.
कोण आहे रचेल गुप्ता?
'मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 विजेता रचेल गुप्ता पंजाबमधील जालंधरची रहिवासी आहे. रचेल गुप्ता 20 वर्षांची आहे रचेल गुप्ताने अनेक ब्युटी पेजंटमध्ये भाग घेतला आहे. याआधीही तिने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. याआधी 2022 मध्ये तिने 'मिस सुपर टॅलेंट ऑफ द वर्ल्ड' किताब पटकावला होता. रचेल गुप्ता एक मॉडेल असण्यासोबतट एक उद्योजक देखील आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर रचेल गुप्ताचे 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :