एक्स्प्लोर

Raada Marathi Movie : 'मैनाचा पोपट झाला', 'राडा' चित्रपटातील धमाल गाण्यावर हिना पांचाळ धरायला लावणार ठेका!

Raada Marathi Movie : साऊथ स्टाईल कमालीची अ‍ॅक्शन आणि कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेला 'राडा' (Raada) चित्रपट येत्या 23 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

Raada Marathi Movie : साऊथ स्टाईल कमालीची अ‍ॅक्शन आणि कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेला 'राडा' (Raada) चित्रपट येत्या 23 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. 'राडा' चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच हवा सुरू आहे. अशातच चित्रपटातील एक नवं कोरं 'मैनाचा पोपट झाला' हे गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'राडा' चित्रपटातील या आयटम साँगमध्ये आपले सर्वांचे लाडके मास्टरजी गणेश आचार्य आणि अभिनेत्री, नृत्यांगना हिना पांचाळ यांची जुगलबंदी पाहणं रंजक ठरणार आहे.

याआधी गणेश आचार्य यांचं ‘चिमणी उडाली’ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा गणेश आचार्य यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

पाहा गाणे :

दमदार कलाकारांची फौज

राम शेट्टी निर्मित 'राडा' (Raada) या चित्रपटाचा नायक ‘समा’ म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार 'राडा' या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. तर राम शेट्टी निर्मित, रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प - पडगीलवार कॉर्पोरेशन यांच्या या चित्रपटात आकाश शेट्टीसह मिलिंद गुणाजी, संजय खापरे, गणेश यादव, अजय राठोड, गणेश आचार्य, निशिगंधा वाड,  योगिता चव्हाण, सिया पाटील, हिना पांचाळ, शिल्पा ठाकरे या कलाकारांना पाहणे रंजक ठरणार आहे.

ताल धरायला लावणारं गाणं

याशिवाय चित्रपटात आपले सर्वांचे लाडके विनोदवीर लच्छु देशमुख यांच्या अभिनयाची जादूही पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीनही धुरा पेलवल्या आहेत. तर चित्रपटातील 'मैनाचा पोपट झाला' या गाण्याच्या संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना यांनी सांभाळली असून, गाण्याचे बोल जाफर सागर लिखित आहे. तर गायक उर्मिला धनगर आणि जसराज जोशी यांनी या गाण्याला स्वरबद्ध केले आहे. उर्मिला आणि जसराजच्या आवाजातील आणि त्याला मास्टरजी आणि हिनाच्या नृत्याची जोड मिळताच या गाण्याची शोभा अधिकच द्विगुणित झाली आहे. तर या सुपर अ‍ॅक्शनपटाचे चित्रीकरण के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. 

प्रेक्षकांना राडा चित्रपटातील 'मैनाचा पोपट झाला' हे गाणे नक्कीच थिरकायला भाग पाडणार यांत शंका नाही. भव्यदिव्य अ‍ॅक्शनपटाचे दमदार सीन्स, रोमँटिक कथा, सुपरहिट गाणी येत्या 23 सप्टेंबरला प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहेत.

हेही वाचा :

Raada : मराठमोळ्या 'राडा'ला मिळालाय साऊथ स्टाईल टच, चित्रपटाच्या मोशन पोस्टरची सर्वत्र हवा!

Yogita Chavan : मल्हारची ‘अंतरा’ चित्रपटात झळकणार! ‘राडा’मध्ये दिसणार योगिता चव्हाणचा रावडी लूक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News : नाशिकमध्ये आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू, अंगावर अनेक जखमा, अपघात की घातपात?
नाशिकमध्ये आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू, अंगावर अनेक जखमा, अपघात की घातपात?
Malegaon Blast Case : मोहन भागवतांना उचलून मुंबईत आणा, परमबीर सिंह यांचा तत्कालिन एटीएस अधिकाऱ्यांना आदेश! पण, आदेश न पाळल्याने, एनआयए कोर्टात सनसनाटी दावा
मोहन भागवतांना उचलून मुंबईत आणा, परमबीर सिंह यांचा तत्कालिन एटीएस अधिकाऱ्यांना आदेश! पण, आदेश न पाळल्याने, एनआयए कोर्टात सनसनाटी दावा
''कधीकाळी या बाई पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या''; वाघबाई म्हणत अंधारेंचा निशाणा, सगळंच काढलं
''कधीकाळी या बाई पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या''; वाघबाई म्हणत अंधारेंचा निशाणा, सगळंच काढलं
Harshvardhan Sapkal Majha Maharashtra Majha Vision: औरंगजेबाप्रमाणेच हे सरकार धर्माचा वापर करून घटनांना दाबतंय; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या वक्तव्यावर ठाम!, म्हणाले....
औरंगजेबाप्रमाणेच हे सरकार धर्माचा वापर करून घटनांना दाबतंय; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या वक्तव्यावर ठाम!, म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिल्यास...Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर...Devendra Fadnavis Rapid Fire  : लाडकं कोण? राज की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांचं उत्तर ऐकाचABP Majha Headlines : 09 AM : 21 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News : नाशिकमध्ये आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू, अंगावर अनेक जखमा, अपघात की घातपात?
नाशिकमध्ये आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू, अंगावर अनेक जखमा, अपघात की घातपात?
Malegaon Blast Case : मोहन भागवतांना उचलून मुंबईत आणा, परमबीर सिंह यांचा तत्कालिन एटीएस अधिकाऱ्यांना आदेश! पण, आदेश न पाळल्याने, एनआयए कोर्टात सनसनाटी दावा
मोहन भागवतांना उचलून मुंबईत आणा, परमबीर सिंह यांचा तत्कालिन एटीएस अधिकाऱ्यांना आदेश! पण, आदेश न पाळल्याने, एनआयए कोर्टात सनसनाटी दावा
''कधीकाळी या बाई पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या''; वाघबाई म्हणत अंधारेंचा निशाणा, सगळंच काढलं
''कधीकाळी या बाई पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या''; वाघबाई म्हणत अंधारेंचा निशाणा, सगळंच काढलं
Harshvardhan Sapkal Majha Maharashtra Majha Vision: औरंगजेबाप्रमाणेच हे सरकार धर्माचा वापर करून घटनांना दाबतंय; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या वक्तव्यावर ठाम!, म्हणाले....
औरंगजेबाप्रमाणेच हे सरकार धर्माचा वापर करून घटनांना दाबतंय; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या वक्तव्यावर ठाम!, म्हणाले....
Karuna Sharma on Dhananjay Munde : घरच्या नोकराकडे चार-चार हजार कोटीची प्रॉपर्टी, पण स्वतःच्या बायकोसाठी धनंजय मुंडेंकडे दोन लाख रुपये सुद्धा नाहीत; करुणा शर्मांचा हल्लाबोल
घरच्या नोकराकडे चार-चार हजार कोटीची प्रॉपर्टी, पण स्वतःच्या बायकोसाठी धनंजय मुंडेंकडे दोन लाख रुपये सुद्धा नाहीत; करुणा शर्मांचा हल्लाबोल
Allahabad High Court : स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही, मग 'पॉक्सो' कायद्याचं काय होणार? देशभरात संताप, सर्वोच्च न्यायालय दखल देणार का?
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही, मग 'पॉक्सो' कायद्याचं काय होणार? देशभरात संताप, सर्वोच्च न्यायालय दखल देणार का?
Sanjay Raut : फडणवीसांनी कुदळ-फावडे घेऊन कबर तोडायला जावं, पत्रबाजीची नाटकं बंद करा; संजय राऊतांनी ललकारलं
फडणवीसांनी कुदळ-फावडे घेऊन कबर तोडायला जावं, पत्रबाजीची नाटकं बंद करा; संजय राऊतांनी ललकारलं
Yashwant Verma : दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरात आग लागताच अग्नीशमन यंत्रणा पोहोचली, पण घरातला नोटांचा 'खजिना' पाहून डोळे विस्फारण्याची वेळ!
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरात आग लागताच अग्नीशमन यंत्रणा पोहोचली, पण घरातला नोटांचा 'खजिना' पाहून डोळे विस्फारण्याची वेळ!
Embed widget