Yogita Chavan : मल्हारची ‘अंतरा’ चित्रपटात झळकणार! ‘राडा’मध्ये दिसणार योगिता चव्हाणचा रावडी लूक
Raada Marathi Movie : अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) 'राडा' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाली आहे.
Raada Marathi Movie : 'राडा' (Raada) चित्रपटाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजतेय. फुल्ल ऑफ अॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या या 'राडा' चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहे. आता आणखी एक सुखद धक्का प्रेक्षकांना मिळणार आहे, तो म्हणजे छोट्या पडद्यावरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेत मुख्य भूमिका साकारून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) 'राडा' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाली आहे.
राम शेट्टी निर्मित 'राडा' या चित्रपटात ‘अंतरा’ म्हणजेच अभिनेत्री योगिता मुख्य भूमिकेत दिसणार असून, तिचा रावडी आणि मितभाषी असे दोन्ही लूक या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात योगिताचा लव्हेबल अंदाजही प्रेक्षकांना विशेष भावणार आहे. तर, योगिताला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प - पडगीलवार कॉर्पोरेशन यांच्या हा भव्यदिव्य 'राडा' या अॅक्शनपट पाहणे नक्कीच रंजक ठरणार आहे.
योगिताला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक!
दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले केले असून, चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना व एका गाण्याची धुरा मयुरेश केळकर यांनी सांभाळली असून गाण्याचे बोल जाफर सागर लिखित असून त्यापैकी एक गाणे विष्णू थोरे यांनी लिहिले आहे. तर, हा भव्य ऍक्शनपट के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. या भव्य अॅक्शनपटात योगितासोबत आणखी कोणते कलाकार दिसणार, हे पाहणं औत्स्युक्याचे ठरणार आहे. येत्या 23 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणाऱ्या 'राडा' (Raada) या चित्रपटातून योगिताला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक झाले आहेत.
नवीन चेहऱ्यांना संधी
अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार 'राडा' या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. तो या चित्रपटात मुख्य नायकाची अर्थात ‘समा’ भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि पोस्टरवरील त्याचा स्टनिंग लूक चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखी वाढवत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. साऊथ लूकचा टच घेत आकाश पहिल्यांदाच अॅक्शनपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सध्या मराठी चित्रपटावरही साऊथचा प्रभाव पाहायला मिळत आहे. या चित्रपटातही साऊथ स्टाईल अॅक्शन पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा :
Raada : मराठमोळ्या 'राडा'ला मिळालाय साऊथ स्टाईल टच, चित्रपटाच्या मोशन पोस्टरची सर्वत्र हवा!