एक्स्प्लोर

Pushpa 2 Box Office Collection Day 34: बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2'च्या कमाईचा वेग मंदावला; पण, 1831 कोटींचा गल्ला जमवल्याचा मेकर्सचा दावा, खरी कमाई किती?

Pushpa 2 Box Office Collection Day 34: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'नं थिएटर्समध्ये धुमाकूळ घातला आहे. रिलीज झाल्यानंतर 34 दिवस होऊनही हा चित्रपट कोट्यवधींची कमाई करत आहे. पण, असं असलं तरीदेखील आता मात्र, वाईल्ड फायर पुष्पाच्या कमाईत कमालीची घट दिसत आहे.

Pushpa 2 Box Office Collection Day 34: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun Movie) चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2 The Rule) 5 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) भूकंप झाला. तेव्हापासून आतापर्यंत पुष्पानं (Pushpa Movie) बॉक्स ऑफिसवरचा आपला ताबा सोडलेला नाही. पुष्पा 2 नंतर रिलीज झालेल्या अनेक चित्रपटांनाही पुष्पा 2 नं पाणी पाजलं. दरम्यान, बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केल्यानंतर महिनाभरानंतर सुकुमार दिग्दर्शित चित्रपटाच्या कमाईचा वेग आता थोडा मंदावला आहे. 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2 The Rule) नं रिलीजच्या 34 व्या दिवशी किती कलेक्शन केलं, जाणून घेऊया?

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' या चित्रपटानं जगभरात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट भारतात सर्वाधिक कमाई करणारा पहिल्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. मात्र, जगभरातील कमाईच्या बाबतीत हा चित्रपट अजूनही या दोन चित्रपटांच्या तुलनेत मागे असल्याचं दिसून येत आहे. तो 'बाहुबली 2' (1788.06 कोटी) च्या जगभरातील कलेक्शनच्या अगदी जवळ आला आहे, तर आता 'पुष्पा 2' साठी आमिर खानच्या 'दंगल' (2070.3 कोटी) ला मागे टाकणं फार कठीण दिसत आहे.

SACNILK नं आतापर्यंत जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाची जगभरातील कमाई 32 दिवसांत 1710 कोटी रुपये झाली आहे, तर निर्माते आणि अल्लू अर्जुन यांच्या सोशल मीडिया पोस्टनुसार चित्रपटाच्या संकलनाची आकडेवारी यापेक्षा खूप जास्त आहे. अल्लू अर्जुननं एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे सांगितलं की, चित्रपटानं अवघ्या 28 दिवसांत जगभरात 1299 कोटींचा आकडा पार केला आहे. 32 दिवसांत जगभरात 1,831 कोटी रुपये कमावतील, असं निर्मात्यांनी सांगितलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mythri Movie Makers (@mythriofficial)

34 व्या दिवशी 'पुष्पा 2' ची कमाई किती?

Sacnilk नुसार, चित्रपटानं पाचव्या मंगळवारी म्हणजेच, 34 व्या दिवशी 2.25 कोटींची कमाई केली आहे. एकूणच, या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 1210.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'पुष्पा 2'ची जगभरातील कमाई 1712 कोटींहून अधिक

जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने 34 दिवसांत 1712.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाने परदेशात जवळपास 270 कोटींची कमाई केली आहे. 

  • 'पुष्पा 2: द रुल'च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपयांची कमाई केली होती.
  • दुसऱ्या आठवड्यात चित्रपटानं 264.8 कोटींचा गल्ला जमवला.
  • तिसऱ्या आठवड्यात 'पुष्पा 2: द रुल'चा व्यवसाय 129.5 कोटी रुपयांचा होता.
  • चौथ्या आठवड्यात 'पुष्पा 2: द रुल'नं 69.65 कोटींचा व्यवसाय केला.
  • 30व्या दिवशी चित्रपटानं 3.75 कोटी रुपये कमावले, 31व्या दिवशी 5.5 कोटी रुपये, तर 32व्या दिवशी 7.2 कोटी रुपयांची कमाई केली.
  • 33व्या दिवशी 'पुष्पा 2: द रुल'नं 2.5 कोटी रुपयांची कमाई केली होती.
  • आता 'पुष्पा 2: द रुल'च्या 34व्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
  • Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, चित्रपटानं 2.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
  • यासह, 34 दिवसांत 'पुष्पा 2: द रुल'ची एकूण कमाई आता 1210.95 कोटी रुपये झाली आहे.

गेम चेंजर 'पुष्पा 2'चा गेम संपवणार का?

'पुष्पा 2: द रुल' महिनाभरापासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. रिलीज होऊन 34 दिवस उलटले तरीही चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. पण आता राम चरण आणि कियारा अडवाणी यांचा गेम चेंजर 'पुष्पा 2: द रुल'ला टक्कर देण्यासाठी येत आहे. या चित्रपटाचीही जोरदार चर्चा आहे. असा अंदाज आहे की, गेम चेंजर रिलीज झाल्यानंतर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रुल'ची वाटचाल संपुष्टात येईल. आता 'गेम चेंजर' रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट किती कमाई करतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'पुष्पा 2' आता थांबतच नाही... 'गेम चेंजर'पासून वाचवण्यासाठी निर्मात्यांची नवी चाल; 20 मिनिटांच्या एक्स्ट्रा सीन्ससह रिलोड वर्जन रिलीज होणार

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
Embed widget