'पुष्पा 2' आता थांबतच नाही... 'गेम चेंजर'पासून वाचवण्यासाठी निर्मात्यांची नवी चाल; 20 मिनिटांच्या एक्स्ट्रा सीन्ससह रिलोड वर्जन रिलीज होणार
Pushpa 2 Reloaded Version: 'गेम चेंजर' आणि 'फतेह' यांच्यासोबतचा क्लॅश टाळण्यासाठी 'पुष्पा 2'च्या निर्मात्यांनी नवी रणनीती अवलंबली आहे. निर्मात्यांनी खुलासा केला आहे की, आता चित्रपटात 20 मिनिटांचं बोनस फुटेज जोडलं जाणार आहे.
Pushpa 2 Reloaded Version: 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2 The Rule) बॉक्स ऑफिस (Box Office Collection) गाजवत आहे. या चित्रपटानं जगभरात 1800 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. अशातच चित्रपटाची धुवांधार कमाई चांगली ठेवण्यासाठी निर्मात्यांनी नवी रणनीती आखली आहे. 'पुष्पा 2: द रुल' लवकरच त्याच्या रीलोडेड व्हर्जनसह थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
'पुष्पा 2: द रुल'च्या निर्मात्यांनी अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. अल्लू अर्जुन स्टारर आणि सुकुमार दिग्दर्शित (Directed by Sukumar) या चित्रपटात आता 20 मिनिटांचं बोनस फुटेज जोडले जातील, असं निर्मात्यांनी जाहीर केलं आहे. निर्मात्यांनी खुलासा केला आहे की 'पुष्पा 2: द रुल'ची रीलोडेड आवृत्ती 11 जानेवारीपासून थिएटरमध्ये दिसणार आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत निर्मात्यांनी ही माहिती दिली आहे.
'पुष्पा 2: द रुल'च्या निर्मात्यांनी चाहत्यांना आणखी एक गिफ्ट देण्याचा निर्ण घेतला आहे. मेकर्सनी अनाऊंस केलं की, 11 जानेवारीपासून थिएटर्समध्ये फिल्मसोबत 20 मिनिटांचं एक्स्ट्रा फुटेज जोडलं जाईल. 11 जानेवारीपासून 'पुष्पा'ची वाईल्ड फायर आणखी 20 मिनिटं चित्रपटगृहांमध्ये सुरू राहणार आहे. निर्मात्यांनी एक पोस्टर शेअर करून याची घोषणा केली आहे.
View this post on Instagram
'गेम चेंजर' आणि 'फतेह' सोबतचा क्लॅश टाळण्यासाठी 'पुष्पा 2'ची नवी चाल
10 जानेवारीला राम चरण आणि कियारा अडवाणी यांचा मोस्ट अवेटेड पॉलिटिकल ड्रामा 'गेम चेंजर' चित्रपटगृहात दाखल होणार आहे. तसेच, सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा 'फतेह' हा चित्रपटही 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन्ही चित्रपटांच्या रिलीजचा परिणाम 'पुष्पा 2: द रुल'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होऊ शकतो. अशा परिस्थितीत, क्लॅशचा परिणाम टाळण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाची रीलोडेड आवृत्ती प्रदर्शित करण्याचं धोरण अवलंबलं आहे.
'पुष्पा 2: द रुल' चं वर्ल्डवाइड कलेक्शन
'पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबर 2024 रोजी मोठ्या पडद्यावर आला होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला असून आजही तो दररोज कोट्यवधींची कमाई करत आहे. या चित्रपटानं जगभरात 1831 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे आणि जगभरात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा भारतीय चित्रपट ठरला आहे.
'पुष्पा 2'च्या हिंदी आवृत्तीची रेकॉर्डब्रेक कमाई
'पुष्पा 2: द रुल' रिलीज झाल्यापासून रेकॉर्ड तोडत आहे. सुकुमार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. चौथ्या आठवड्यात हा बॉक्स ऑफिसवर टिकून आहे, रविवारी निर्मात्यांनी जाहीर केलं की, चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीनं भारतात 800 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. एखाद्या तेलुगु चित्रपटासाठी ही मोठी उपलब्धी आहे.