Puneeth Rajkumar Birth Anniversary : लाडक्या अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट पाहून चाहते भावूक, चित्रपटगृह ‘पुनीत’च्या नावाने दुमदुमले!
James Movie : पुनीत कुमारच्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवशी त्याला शेवटच्या वेळी पडद्यावर पाहण्याची भेट मिळणार आहे.
![Puneeth Rajkumar Birth Anniversary : लाडक्या अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट पाहून चाहते भावूक, चित्रपटगृह ‘पुनीत’च्या नावाने दुमदुमले! Puneeth Rajkumar Birth Anniversary Actors Puneeth’s Last movie James released in theater Puneeth Rajkumar Birth Anniversary : लाडक्या अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट पाहून चाहते भावूक, चित्रपटगृह ‘पुनीत’च्या नावाने दुमदुमले!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/17/adb7290ded051016e2a155bb082cab51_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Puneeth Rajkumar Birth Anniversary : साऊथ सिनेमाचा सुपरस्टार पुनीत कुमारचा (Puneeth Rajkumar) आज 17 मार्चला वाढदिवस आहे. एकाहून एक धमाकेदार परफॉर्मन्स देऊन त्याने इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला होता. पुनीत कुमारचे गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ज्यातून चाहते अद्याप सावरलेले नाहीत. दुसरीकडे, पुनीत कुमारच्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवशी त्याला शेवटच्या वेळी पडद्यावर पाहण्याची भेट मिळणार आहे. पुनीत त्याच्या शेवटच्या दिवसात याच चित्रपटावर काम करत होता. निर्मात्यांनी पुनीतचा शेवटचा चित्रपट त्याच्या वाढदिवसाला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता.
अभिनेता पुनीतच्या मृत्यूनंतर ‘जेम्स’ (James) हा त्याचा शेवटचा चित्रपट आहे. पुनीतच्या चित्रपटाचे पोस्टर अभिनेता शिव राजकुमारने प्रजासत्ताक दिनानिमित्ताने प्रदर्शित केले होते. पोस्टर शेअर करताना प्रिन्स शिवाने लिहिले होते की, 'जेम्स अप्पूकडून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा'. शिव पुनीतचा भाऊ आहे. त्याच वेळी, निर्मात्यांनी घोषणा केली होती की, पुनीतच्या जयंतीदिनी म्हणजेच 17 मार्च 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटगृह ‘पुनीत’च्या दुमदुमले!
अखेर हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पुनीतचे चाहते आणि प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकाराचा शेवटचा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले आहेत. यावेळी त्याला शेवटचं पडद्यावर पाहून प्रेक्षकांनी जल्लोष केला. यावेळी चित्रपटगृह ‘पुनीत’च्या नावाने दुमदुमले होते.
शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही!
'जेम्स' हा चित्रपट चेतन कुमार यांनी दिग्दर्शित केला असून, चेतनने यापूर्वी पुनीतसोबत 'राजकुमार' हा ब्लॉकबस्टर कन्नड चित्रपट दिला आहे. ‘जेम्स’ या चित्रपटात प्रिया आनंद मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पुनीतने जवळपास संपूर्ण चित्रपट शूट केला. एकच अॅक्शन सीक्वेन्स बाकी होता. याशिवाय पुनीत हा चित्रपट डबही करू शकला नाही. मात्र, तरीही हा चित्रपट पूर्ण करून निर्मात्यांनी तो प्रदर्शित केला आहे.
हेही वाचा :
- The Kashmir Files : ‘सत्य समोर आणणारे असे आणखी चित्रपट बनले पाहिजेत’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘द काश्मीर फाईल्स’चे कौतुक!
- The Kashmir Files Box Office Collection Day 4: आठवड्याच्या पहिल्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दिसली ‘द काश्मीर फाईल्स’ची जादू!
- The Kashmir Files : बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता 'द कश्मीर फाइल्स' ओटीटीवर; 'या' प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)