Priya Marathe Passed Away : अभिनेत्री प्रिया मराठे प्रिया मराठेचे निधन, टेलिव्हिजनवरील 'या' मालिका ठरल्या होत्या सुपरहिट
Priya Marathe Passes Away: मराठी सिनेसृष्टीतून एक अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे.

Marathi Actress Priya Marathe Passes Away: मराठी सिनेसृष्टीतून एक अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिचं निधन झालं आहे. प्रिया मराठे हिला अडीच वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. तेव्हापासून तिची कर्करोगाशी लढाई सुरु होती. मात्र आज पहाटे चार वाजता तीचे निधन झाले असून सर्वत्र मोठी शोककाळा पसरली आहे. दरम्यान प्रिया मराठे ही अभिनेता शंतनू मोघे यांची पत्नी आहे. मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली होती. मात्र, अलीकडेच तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरु लागला. अखेर शनिवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली.
प्रिया मराठे हिने 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून हिंदी मनोरंजनविश्वातही स्वत:च्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. 'कसम से', 'बडे अच्छे लगते है', या हिंदी मालिकांमध्येही तिने काम केले होते. याशिवाय, 'चार दिवस सासूचे', 'तू तिथे मी' या मराठी मालिकांमध्येही तिने काम केले होते. मराठी मालिका विश्वात प्रिया मराठे हिचा चेहरा सर्वांच्या ओळखीचा होता. तिच्या निधनाने मराठी प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.
'तुझेच मी गीत गात आहे' ठरली शेवटची मालिका
छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिने तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रिया ही तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत काम करत होती. पण काही दिवसांपूर्वी प्रियानं ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात ती कर्करोग या दुर्धर आजाराशी झुंज देत होती. मात्र नियतीने घात केला आणि तुझेच मी गीत गात आहे ही लोकप्रिय मालिका प्रिया मराठेची शेवटची मालिका ठरलीय.
प्रियाच्या अभिनयाला कायमच प्रेक्षकांची पसंती
चार दिवस सासूचे, तू तिथे मी, या सुखांनो या मराठी मालिकांमधील प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. प्रियानं 'कसम से', 'पवित्र रिश्ता', 'बडे अच्छे लगते है' या हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. प्रिया ही तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मोनिका ही भूमिका साकारत होती. पण प्रियानं ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. प्रिया ही तिच्या अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. प्रिया ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असायची. विविध लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असे. तिला इन्स्टाग्रामवर 600K फॉलोवर्स होते. मात्र या अकाली निधनाने मराठी प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























