लग्नानंतर वेगळं घर शोधा, वेगळं राहा, मजेत राहा; आदेश बांदेकरांच्या पत्नीने मुलाला कोणता सल्ला दिला?
Aadesh Bandekar wife Suchitra Bandekar : गेल्या काही दिवसांपासून अभिनेते आदेश बांदेकर यांच्या मुलाच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अशातच आदेश बांदेकर यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यांनी त्यांच्या मुलाला महत्त्वपूर्व सल्ला दिलाय.

Aadesh Bandekar wife Suchitra Bandekar : महाराष्ट्राचे लाडके ‘भावोजी’ आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत सोहम बांदेकर याने देखील प्रतिक्रिया दिली होती. त्याने लग्नाच्या चर्चेला होकार ही देणार नाही आणि नकारही देणार नसल्याचं म्हटलं होतं. याआधीही त्याच्या लग्नाविषयी अनेकदा चर्चेला उधाण आलं होतं, मात्र त्यावेळी सोहमने नेहमीच मौन बाळगलं होतं. पण आता त्याच्या लग्नाची बातमी जवळपास निश्चित झालेली आहे. दरम्यान, लग्न होण्यापूर्वी सोहम बांदेकरला सुचित्र बांदेकर यांनी काही सल्ले दिले आहेत. सुचित्रा बांदेकर नेमकं काय काय म्हणाल्या? जाणून घेऊयात..
सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, सोहमचं लग्न सध्या माझ्यासाठी प्रायोरिटी आहे. मला वाटतं मुलांनी वेळेत सेटल व्हायला पाहिजे. उगाचच का वेळ काढायचा? आयुष्याची सेकंड इनिंग सुरु होते. जेवढं तुम्ही उशीरा लग्न करता, तेवढी तुमची अॅडजेस्ट करण्याची लेवल कमी होते. मला तसं नकोय. लग्न ही संकल्पना फार छान आहे. दोघांनी मिळून आयुष्य सुरु करायचं असतं. फक्त तुम्ही चांगल्या पद्धतीने एक्सिक्युट करायला पाहिजे. तुमच्यामध्ये हेवेदावे नाही पाहिजेत. मी जास्त कमावतो, तू कमी कमावतो. तुला कोणत्या कुटुंबाची पार्श्वभूमी आहे? मला कोणत्या कुटुंबाची पार्श्वभूमी आहे? असं काही नसतं. दोघांनी आनंदात राहावं. एकमेकांना अॅडजेस्ट करत राहावं. तिचे प्रॉबलेम तुमचे आहेत, असं समजून फेस करावेत.
सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, आदेशला तीन भाऊ होते. लग्न झाल्यावर मुलांनी वेगळं राहायचं. तुमचा संसार तुम्ही करायचा. तुम्हाला लागलं तर मी आहे. रोज येऊन घरी जेवण करा. पण आपआपल्या घरी झोपायला जावा आणि आपआपले संसार करा, असं आदेशच्या आईचं म्हणणं होतं. मी पण त्याच कंसेप्टची आहे. मी सोहला सांगितलंय, लग्नानंतर वेगळं घर शोधा..मस्त मजेत राहा. आई बाबा आहेतच..एकत्रित राहून चकचक करत राहायचं.
सोहम हा आदेश व सुचित्रा बांदेकर यांचा एकुलता एक मुलगा आहे. बांदेकर कुटुंबाच्या प्रोडक्शन हाऊसचं नावही त्याच्याच नावे असून त्याची जबाबदारी तो स्वतः सांभाळतो. त्यांच्या या निर्मिती संस्थेखाली सध्या प्रसारित होणारी ‘ठरलं तर मग’ ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका आहे. खऱ्या आयुष्यात मात्र सोहमच्या हृदयाची राणी ठरली आहे अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari). मीडिया रिपोर्टनुसार, सोहम आणि पूजा लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. पूजा सध्या स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मंजिरीच्या मुख्य भूमिकेत झळकत आहे. तिच्या अभिनयाचं आणि सौंदर्याचं नेहमीच कौतुक झालं आहे. बांदेकर घराण्याची सून होणार असल्यामुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांचा फोटो शेअर करत रितेश देशमुखची पोस्ट, म्हणाला..
























