प्रकाश राज, विजय देवरकोंडा ते राणा दग्गुबातीसह 29 कलाकारांची ईडीकडून चौकशी होणार, मनी लाँडरिंग प्रकरणात मोठ्या हालचाली
South Cinema 29 celebrities and Money Laundering Case : सट्टेबाजीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 29 सेलिब्रिटींविरुद्ध चौकशी सुरू केली आहे, ज्यामध्ये अनेक दक्षिण भारतीय कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.

South Cinema 29 celebrities and Money Laundering Case : सक्तवसुली संचालनालय(ED - Enforcement Directorate) ने बेटिंग अॅप म्हणजेच सट्टेबाजीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात 29 सेलिब्रिटींविरोधात कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात या 29 सेलिब्रिटींच्या विरोधात चौकशी सुरू झाली असून त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी या बेकायदेशीर बेटिंग अॅपचा प्रचार/प्रसार केला होता. ज्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे, त्यामध्ये खालील प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे:
विजय देवरकोंडा
राणा दग्गुबाती
मंचू लक्ष्मी
प्रकाश राज
निधी अग्रवाल
अनन्या नगल्ला
श्रीमुखी
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ही ईडीची कारवाई हैदराबादमधील सायबराबाद पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर करण्यात आली आहे. या सेलिब्रिटींवर आरोप आहे की, त्यांनी बेकायदेशीर बेटिंग अॅपचे प्रमोशन केले होते किंवा त्या अॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारात सहभागी होते. या प्रकरणात मनी लाँडरिंग आणि बेकायदेशीर सट्टेबाजीशी संबंधित बाबींची चौकशी सुरू आहे. ईडी आता या सर्व सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलवू शकते तसेच त्यांचे बँक व्यवहारही तपासले जातील.
या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की या घोटाळ्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतलेले आहेत. जेव्हा हे प्रकरण समोर आले तेव्हा दक्षिणेतील अभिनेते आणि हिंदी सिनेमांमध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले प्रकाश राज यांनी स्वीकारले की, त्यांनी 2015 मध्ये अशाच एका जाहिरातीत काम केले होते. मात्र, एका वर्षाच्या आत त्यांनी ही डील सोडून दिली होती.
त्याचवेळी ‘राणा नायडू’ फेम राणा दग्गुबाती यांच्या टीमनेही स्पष्ट केले की, त्यांचा जाहिरात करार संपूर्णपणे कायदेशीर होता आणि त्यांनी कोणत्याही बेकायदेशीर करारामध्ये सहभाग घेतलेला नाही. देवरकोंडा आणि दग्गुबाती यांच्याशिवाय, या आरोपींच्या यादीत तेलुगू चित्रपटसृष्टीतील (टॉलीवूड) इतर अनेक प्रसिद्ध व्यक्तींचाही समावेश आहे. यामध्ये प्रकाश राज, मंचू लक्ष्मी, निधी अग्रवाल, प्रणीता सुभाष आणि अनन्या नागेल्ला यांची नावे आहेत.
या यादीत श्रीमुखी, श्यामला, वर्षिनी सौंदरराजन, हर्षा साई, वसंत कृष्णन, अमृता चौधरी, नयनी पवनी, शोभा शेट्टी, नेहा पठाण, पांडू, पद्मावती आणि बय्या सनी यादव यांसारख्या सोशल मीडियावरील प्रभावशाली व्यक्तींचाही समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय खुलासे होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























