एक्स्प्लोर

Prachi Pisat On Sudesh Mhashilkar: 'तुझा नंबर पाठव ना, तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीय...'; अभिनेत्रीकडून दिग्गज मराठी अभिनेत्याच्या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर, खळबळजनक आरोप

Prachi Pisat On Sudesh Mhashilkar: झी मराठीवरची 'तू चालं पुढे' मालिका प्रचंड गाजली. मालिकेत अनेक कलाकार झळकले, पण त्यांपैकी ताराची भूमिका साकारणारी प्राची पिसाटही साऱ्यांच्या लक्षात राहिली.

Prachi Pisat On Sudesh Mhashilkar: सिनेसृष्टी जेवढी ग्लॅमरस दिसते, तेवढी ती खरोखरच आहे का? हा प्रश्न कायम चर्चेत असतो. अनेकजण सिनेसृष्टी मग बॉलिवूड (Bollywood) किंवा मराठी इंडस्ट्री (Marathi Industry) एक मायाजाल असल्याचंही सांगतात. यापूर्वी आणि आजही अनेक अभिनेत्री त्यांना आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबाबत उघडपणे बोलतात. तर, अनेकजणींना को-स्टार किंवा दिग्दर्शकाकडून मिळालेल्या घाणेरड्या वागणुकीचा बळी पडल्याचंही सांगतात. असाच अनुभव मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रीच्या वाट्याला आला आहे. 

झी मराठीवरची (Zee Marathi) 'तू चालं पुढे' मालिका प्रचंड गाजली. मालिकेत अनेक कलाकार झळकले, पण त्यांपैकी ताराची भूमिका साकारणारी प्राची पिसाटही साऱ्यांच्या लक्षात राहिली. प्राची सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. पण, नुकताच प्राचीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केलीय. जी चर्चेचा विषय ठरतेय. प्राची पिसाटनं प्रसिद्ध सिने अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी तिला केलेल्या फेसबुक मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. हा स्क्रिनशॉर्ट शेअर करत प्राचीनं अनेक गंभीर आरोप केले आहेत. 

प्राचीनं आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये सुदेश म्हशीलकर यांच्या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत म्हटलं आहे की, 'आणि मला हा स्क्रिनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली... बायकोचा नंबर असलेच... ती ही गोड आहे... बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का... ही पोस्ट डिलीट कर सांगायला कुठून तरीनंबर मिळवशील आणि कॉल करशीलच' तसेच, प्राचीनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'इच्छा नसेल माफी मागायची आणि तुम्हाला वेळ असेल तर बाकीच्या मुलींनी सांगितलेले तुमचे किस्सेही सांगू शकते...' 

Prachi Pisat On Sudesh Mhashilkar: 'तुझा नंबर पाठव ना, तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीय...'; अभिनेत्रीकडून दिग्गज मराठी अभिनेत्याच्या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर, खळबळजनक आरोप

सुदेश म्हशीलकर यांनी प्राचीला नेमका काय मेसेज केलाय? 

सुदेश म्हशीलकर हे मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्यांमध्ये गणले जातात. सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेमधून झळकत आहेत. आता प्राची पिसाटनं सुदेश यांच्या फेसबुक मेसेजचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. या स्क्रीन शॉटमध्ये असं दिसून येतंय की, 'तुझा नंबर पाठव ना... तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये... कसली गोड दिसतेस' असा मेसेज सुदेश यांनी प्राचीला केला आहे.

सुदेश यांचं फेसबुक अकाउंट हॅक झालंय? 

सुदेश म्हशीलकर यांच्या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट प्राची पिसाटनं शेअर केल्यानंतर युजर्सनी प्राचीला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित सुदेश म्हशीलकर यांचं अकाउंट हॅक झालं असेल, असं अनेक युजर्सचं म्हणणं आहे. तसेच, एका युजरनं म्हटलंय की, "काही लोकं यांना खूप वर्षांपासून ओळखतात आणि एवढी 100 टक्के खात्री ही आहे की, हे नसतील, तू पोलिसांत तक्रार दाखल कर, ते सांगतील हॅकर होता की ते स्वतः आहेत." युजरच्या कमेंटवर प्राचीनंही रिप्लाय केलाय की, "मला कुणालाच त्रास द्यायचा नाही... मला फक्त दोनदा शांतपणे इग्नोर केल्यानंतर एका मॅच्युअर माणसाला कळलं नाही म्हणून माझ्या पद्धतीने मेसेज येणं बंद करायचं होतं." 

प्राची पिसाटच्या पोस्टवर कमेंट करत अभिनेते राजेश देशपांडे यांनी सुदेश म्हशीलकर यांची बाजू घेतली आहे. राजेश देशपांडे म्हणाले की, "हे सुदेशनं केलेलं नाहीये... तो फेसबुकवर अनेक दिवस लॉग इन नाहीये... आणि तो असा माणूस नाहीये...  काहीतरी गफलत आहे." यावरही प्राचीनं रिप्लाय करत लिहिलंय की, "त्यानेच मेसेज केलाय असं त्यांनी अनेकांना सांगितलंय." पुढे प्राचीनं लिहिलंय की, "हो असू शकतं... बाय द वे हॅकर मराठी होता... आणि अनेक महिने मुलींना मेसेज करत असेल... बरं झालं... माझ्या निमित्तानं कळलं तरी असे मेसेज करतोय... आणि हो... हुशार पण होता... लगेच अनफ्रेंड केलं हॅकरने..." असं म्हणत प्राचीनं आणखी एका मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. त्यामध्ये सुदेश म्हशीलकर यांनी लिहिलंय की, "खूपच सेक्सी दिसायला लागलीयेस हल्ली...वा"

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Actress Casting Couch Experience: मोठी फिल्म देतो, कॉम्प्रोमाइज कर, माझ्यासोबत रात्र घालव; रोहित शेट्टीच्या EX गर्लफ्रेंडसोबत काय-काय घडलेलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Modi-Putin : नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Modi-Putin : नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Putin India Visit : नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक
नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारत दौऱ्यापूर्वी मोदींचं कौतुक  
Embed widget