Actress Casting Couch Experience: मोठी फिल्म देतो, कॉम्प्रोमाइज कर, माझ्यासोबत रात्र घालव; रोहित शेट्टीच्या EX गर्लफ्रेंडसोबत काय-काय घडलेलं?
Actress Casting Couch Experience: दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'रूमर्ड गर्लफ्रेंड'लाही कास्टिंग काऊचचा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, तिनं चित्रपटासाठी तडजोड करण्यास नकार दिला.

Actress Casting Couch Experience: सिनेसृष्टीतील (Bollywood News) कास्टिंग काऊचबाबत (Casting Couch) अनेक अनुभव आपण ऐकतो. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी न घाबरता समोर येऊन उघडपणे बेधडक वक्तव्य केली आहेत. मल्लिका शेरावतपासून (Mallika Sherawat) अगदी अंकिता लोखंडेपर्यंत (Ankita Lokhande) अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचसारख्या अत्यंत घाणेरड्या अनुभवांचा सामना करावा लागला आहे. तसेच, कामाच्या बदल्यात अभिनेत्रींकडे अत्यंत घृणास्पद मागण्या करण्यात आल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिलीत, ऐकलीत. एवढंच काय तर, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीची (Rohit Shetty) 'रूमर्ड गर्लफ्रेंड' असलेली अभिनेत्रीही कास्टिंग काऊचपासून वाचू शकलेली नाही.
दिग्दर्शक रोहित शेट्टीची 'रूमर्ड गर्लफ्रेंड' म्हणजे, प्राची देसाई (Prachi Desai), जिनं 2008 मध्ये 'रॉक ऑन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेत्रीनं एकदा तिच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काऊच घटनेबद्दल स्पष्ट वक्तव्य केलेलं. तसेच, इंडस्ट्रीत आल्यानंतर एका दिग्दर्शकानं तिच्याकडे केलेल्या अत्यंत घृणास्पद मागणीचा खुलासाही केलेला. दरम्यान, दिग्दर्शकाच्या मागणीनंतर प्राची देसाईनं तो चित्रपट नाकारला आणि थेट नाही सांगून टाकलं.
कामाच्या बदल्यात दिग्दर्शकाची अत्यंत घाणेरडी मागणी
बॉलिवूड बबलला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत बोलताना प्राची देसाईनं सांगितलं की, तिला एका मोठ्या चित्रपटाची ऑफर आली होती, पण त्यासाठी तिला कॉम्प्रोमाइज करावं लागणार होतं. तिनं सांगितलं की, मोठ्या चित्रपटात काम करण्यासाठी मला थेट कॉम्प्रोमाइज करण्याची ऑफर देण्यात आलेली. पण मी स्पष्ट नकार दिला. त्या दिग्दर्शकानं फोन केल्यानंतर, मी नकार दिला. मी म्हटलेलं की, मला तुमच्या फिल्ममध्ये अजिबातच रस नाही."
चित्रपटासाठी तडजोड करण्यास सांगण्यात आले होते. तो म्हणाला होता- 'मला वाटतं की मला एका खास चित्रपटात, मोठ्या चित्रपटात काम करण्यासाठी थेट ऑफर देण्यात आल्या होत्या, पण मी स्पष्टपणे नकार दिला. 'त्या दिग्दर्शकानं मला फोन केल्यानंतर, मी नकार दिला, मी सांगितलं की, मला तुमच्या चित्रपटात रस नाही.'
रोहित शेट्टीसोबत जोडलं गेलं नाव
कधीकाळी प्राची देसाईचं नाव तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा दिग्दर्शक रोहित शेट्टीशी जोडलं गेलेलं. 'बोल बच्चन'च्या शूटिंगदरम्यान रोहित आणि प्राची यांचं सूत जुळलं, असं सांगितलं जातं. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलेलं. रोहित शेट्टीच्या या एक्स्ट्रा मॅरेटियल ऑफरमुळे त्याची पत्नी माया रोहितला सोडणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला होता. त्यानंतर मात्र, रोहितनं प्राचीची साथ सोडून त्याच्या पत्नीची समजूत काढली आणि आपला संसार वाचवला, असंही सांगितलं जातं. त्यानंतर मात्र, प्राची आणि रोहित यांच्यातील दुरावा वाढला, असंही सांगितलं जातं.
दरम्यान, प्राचीच्या करिअरबाबत बोलायचं झालं तर, तिनं 'रॉक ऑन' सिनेमानंतर इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. ती 'वंस अपन अ टाईम इन मुंबई', 'बोल बच्चन', 'आई, मी और करण' यांसारख्या फिल्म्समध्ये दिसली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अत्यंत भयानक! थिएटरमध्ये सुरू होता 'फायनल डेस्टिनेशन'चा शो, तेवढ्याच थिएटरचं सिलिंग कोसळलं अन्...























