एक्स्प्लोर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली शबाना आझमी यांच्यासाठी प्रार्थना
शबाना आझमी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. शबाना आझमी यांना लवकरच मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी या कार अपघातात जखमी झाल्या आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ त्यांचा अपघात झाला आहे. अपघात झाला त्यावेळी शबाना आझमी यांचे पती ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर हे त्यांच्याच मागे असलेल्या कारमध्ये होते. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत लवकर बरं होण्याची प्रार्थना केली आहे.
शबाना आझमी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. शबाना आझमी या अभिनेत्रीला पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शबाना आझमीचा भाऊ बाबा काही काळापूर्वी नुकताच रुग्णालयात गेला होता. शबाना आझमी यांना लवकरच मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास हा रस्ता अपघात झाला. शबाना आझमी ज्या कारमध्ये जात होत्या त्या समोरुन पुढे जात असलेल्या एका ट्रकला धडक दिली. त्यात शबाना आझमी जखमी झाल्या. उल्लेखनीय म्हणजे त्यांचे पती जावेद अख्तर हे दुसर्या कारमध्ये जात होते. अपघातानंतर जावेद अख्तर हे शबाना आझमीसोबत रुग्णवाहिकेत दिसले. जावेद अख्तरांचा 75 वा वाढदिवस शुक्रवारी (17 जानेवारी) म्हणजेच मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेलमध्ये साजरा करण्यात आला. या पार्टीत शाहरुख खान, गौरी खान, दीपिका पादुकोण, कतरिना कैफ, करण जोहर सारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यापूर्वी 16 जानेवारी रोजी जावेद अख्तर यांचा वाढदिवस शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या जुहू घरीही साजरा करण्यात आला होता. तिथे रेट्रो थीमनुसार जुन्या चित्रपटाच्या लूकमध्ये अनेक चित्रपटातील कलाकार आले होते आणि शबाना आणि जावेद रेट्रो लूकमध्ये दिसले. शबाना आझमी आणि जावेद अख्तर हे दोघेही काही दिवस विश्रांतीसाठी खंडाळ्यातील त्यांच्या बंगल्यावर जात असताना शबाना आझमी यांच्या कारने ट्रकला धडक दिली आणि हा अपघात झाला.The news of @AzmiShabana Ji’s injury in an accident is distressing. I pray for her quick recovery.
— Narendra Modi (@narendramodi) January 18, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement