'फुले' चित्रपटाच्या वादानंतर प्रदर्शनाची तारीख बदलली, दिग्दर्शक थेटच म्हणाले, सेन्सॉर बोर्डालाही वाटतंय... लहान मुलांनी चित्रपट पहावा
सेन्सॉर बोर्डाने ही या चित्रपटाला यु सर्टिफिकेट दिलंय म्हणजे त्यांची ही इच्छा आहे लहान मुलांनी देखील हा चित्रपट पाहावा . असेही ते म्हणालेत.

Phule: फुले चित्रपटातून जातीयवाद वाढवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा ब्राह्मण महासंघाने केल्यानंतर चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन (Anant Mahadevan) यांनी माजी राज्यमंत्री छगन भुजबळांची भेट घेतली . यानंतर रिपब्लिकन पक्षाचे सचिन खरात यांनी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष अनंत दवे यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केल्याने फुले चित्रपटावरून वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती .यावर या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी हा चित्रपट कोणाच्या समर्थनार्थ आहे किंवा कोणाच्या विरोधात आहे हे ट्रेलर पाहून ठरवता येणार नाही .या चित्रपटात दोन्ही घटकांना समानता दिली आहे .सेन्सॉर बोर्डाने ही या चित्रपटाला यु सर्टिफिकेट दिलंय म्हणजे त्यांची ही इच्छा आहे लहान मुलांनी देखील हा चित्रपट पाहावा .असे म्हणत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला . तसेच हा चित्रपट आता 11 एप्रिलला नाही तर 25 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. (Phule Movie)
फुले चित्रपट जातीयवाद वाढवणार असल्याचे सांगत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी फुले चित्रपटातील काही सीन्स वर क्षेप घेतला होता .चित्रपट एकतर्फी नको तो सर्वसमावेशक हवा असेही ते म्हणाले होते . (Entertainment)
'दोन समाजातील जातीभेद नष्ट करण्याचे काम फुल चित्रपटातून होईल ' :अनंत महादेवन
या चित्रपटावरील आक्षेप लक्षात घेता फुले चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी माजी राज्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली .तसेच त्यांनी चित्रपटाबाबत झालेल्या अक्षय पावर थोडासा गैरसमज झालाय .ट्रेलर पाहून लगेच अंदाज काढता येणार नाही चित्रपट कोणाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात आहे .चित्रपट ब्राह्मणांच्या बाजूने की विरोधात आहे हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल किती बॅलेंसिंग चित्रपट आहे .ब्राह्मण समाजाला आम्ही विनंती करू की तुम्ही चित्रपट पहा .काही गैरसमज झाले आहेत त्यांनी क्लिअर करायला आम्ही तयार आहोत .मला विश्वास आहे चित्रपट पाहिल्यावर तेही खुश होतील .या चित्रपटात दोन्ही घटकांना समानता दिली आहे .ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ही शाळा सुरू करू शकले तेव्हा ब्राह्मणांनी त्यांना जागा दिली अशी चित्रपटात संपन्नता बॅलन्सिंग दाखवली आहे .या चित्रपटामुळे दोन समाजातील जातीभेद नष्ट करण्याचं काम होणार असल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन म्हणाले आहेत .हा चित्रपट पाहिल्यावर तेही विचार करतील हा चित्रपट फार पूर्वी तयार होणे गरजेचे होते .दरम्यान छगन भुजबळांच्या भेटीत काय झालं तेही त्यांनी सांगितलं .
चित्रपट 11 एप्रिलला नाही या तारखेला होणार प्रदर्शित
छगन भुजबळ यांचा मोठा पाठिंबा आहे .त्यांनी हेच म्हटलं की पहिल्यांदा फुले यांच्या जीवनावर हिंदी चित्रपट बनतोय .हा चित्रपट आहे का नाही बनला असाच प्रश्न त्यांनी सुद्धा केला त्यामुळे खूप आनंद झाला .या चित्रपट बनवायला सुरुवात केली .त्यांनी सुद्धा या चित्रपटाला पूर्ण समर्थन दिले आहे .हा चित्रपट आता अकरा एप्रिल नाही तर 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे .चित्रपटाविषयी असलेले गैरसमज दोन आठवड्यात क्लियर करून चित्रपट प्रदर्शित करू असं दिग्दर्शक अनंत महादेवन म्हणाले आहेत .
हेही वाचा:
























