'फुले' चित्रपटातून जातीयवाद वाढवण्याचा प्रयत्न, ब्राह्मण महासंघाचा दावा; दिग्दर्शकांनी घेतली छगन भुजबळांची भेट, नक्की झालं घडलं?
phule Film: अनेक पुस्तके आणि उपलब्ध साधनांचा अभ्यास करून हा चित्रपट बनवला असल्याचं ते म्हणालेत. या चित्रपटावरून सध्या राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रीया येत आहेत.

Phule Film: छावा चित्रपटानंतर आता अनंत महादेवन दिग्दर्शित फुले चित्रपटावरून सध्या चांगलाच वाद ओढावण्याची चिन्हे आहेत. या सिनेमाचा नुकताच टिझर प्रदर्शित झाला. या टिझरवर ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी फुले चित्रपट जातीय वाद वाढवणारा असं वक्तव्य केलं असून या चित्रपटातील काही सिनवर आक्षेप घेतला आहे. दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी फुले चित्रपटासाठी राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी प्रत्येक सिनेमा तयार होताना त्याची सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक दिग्दर्शक घेत असतो. अनेक पुस्तके आणि उपलब्ध साधनांचा अभ्यास करून हा चित्रपट बनवला असल्याचं ते म्हणालेत. या चित्रपटावरून सध्या राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रीया येत आहेत. (Phule Film)
झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित ‘फुले’ या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. 11एप्रिल 2025रोजी प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट येणार आहे. दरम्यान अनंत दवेंच्या वक्तव्यावरून अनेकजण प्रतिक्रीया देत आहेत.
सिनेमाच्या निर्माते, दिग्दर्शकांनी घेतली छगन भुजबळांची भेट
मुंबई येथे महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित फुले या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली.मुंबई येथे महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित फुले या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी भेट घेतली.प्रत्येक चित्रपट तयार होताना सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक दिग्दर्शक घेत असतो मात्र या चित्रपटात वस्तुस्थिती दाखवण्यात आली आहे. अनेक पुस्तकांचा आणि विविध उपलब्ध साधनांचा अभ्यास करूनच हा चित्रपट बनविण्यात आला असल्याचे मत चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी व्यक्त केले .दिग्दर्शक अनंत महादेवन, निर्माते अनुया चौहान कुडेचा, निर्माते रितेश कुडेचा आणि सह निर्माते रोहन गोडांबे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली.
सिनेमावर नक्की आक्षेप काय?
फुले चित्रपट जातीय वाद वाढवणार असल्याचं सांगत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांचा फुले चित्रपटातील काही सीनवर आक्षेप घेतला.चित्रपट एकतर्फी नको टीआर तो सर्वसमावेशके असावा असं मतही आनंद दवे यांनी व्यक्त केले.त्या काळी ब्राह्मण समाजाने केलेली मदत चित्रपटात दाखवा अशी मागणी दावेंनी केलीय. दरम्यान, फुले चित्रपटाच्या माध्यमातून खरा इतिहास समोर येत असताना मनुवाद्यांच्या पोटात दुखत आहे, आनंद दवे तुम्हाला खरंच सर्वसमावेशक चित्रपट पाहिजे असेल तर पहिल्यांदा असमानतेचे प्रतीक मनुस्मृति जाळून दाखवा अशी प्रतिक्रीया रिपब्लिकन पक्षाचे सचिन खरात यांनी दिलीय.
काय म्हणाले छगन भुजबळ?
महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित हिंदी मध्ये हा चित्रपट येत आहे. त्यावर दिग्दर्शक आणि बाकी मंडळींनी बरीच मेहनत घेतल्याचे दिसते आहे त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी पाहिलाच पाहिजे महात्मा फुलेंचं कार्य हे देशभर नाही तर जगभर आपण पोहोचवलं पाहिजे असं माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
पहिल्यांदा असमानतेचे प्रतीक मनुस्मृती जाळा: सचिन खरात
11 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले यांच्या जीवनावरील फुले नावाचा चित्रपट येत आहे, त्यामुळे पुण्यातील काहीजणांनी या चित्रपटावरील काही सीन्सवर आक्षेप घेतला आहे, आनंद दवे तर पुढे जाऊन म्हणत आहेत की सर्वसमावेशक चित्रपट दाखवला पाहिजे, परंतु वर्षानुवर्ष काही चित्रपट एकतर्फी चित्रपट दाखवले गेले त्यावेळेस तुम्ही आक्षेप का घेतला नाही आणि काही चित्रपटात कांबळे आडनावाच्या व्यक्तीला चित्रपटात शिपाई किंवा हवालदार दाखवले गेले त्यावेळी हे लोक कुठे लपून बसले होते, यांना मी सांगू इच्छितो की बहुजन समाजाला आता कुठे शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे त्यामुळे आता सत्य बाहेर येत आहे याचमुळे या मनुवाद्यांच्या आता पोटात दुखत आहे असे स्पष्टपणे जाणवत आहे, आनंद दवेंना माझा प्रश्न आहे खरंच तुम्हाला सर्वसमावेशक चित्रपट पाहिजे असेल तर पहिल्यांदा असमानतेचे प्रतीक मनुस्मृती जाळा. असेही रिपब्लिकन पक्षाचे सचिन खरात म्हणाले.
हेही वाचा:
























