Pankaj Tripathi Becomes Bade Papa: पंकज त्रिपाठी यांनी वयाच्या 48 व्या वर्षी दिली गूड न्यूज! पत्नी मृदुला आणि नवजात बाळासोबतचा PHOTO शेअर
Pankaj Tripathi Becomes Bade Papa: पंकज त्रिपाठी यांनी वयाच्या 48 व्या वर्षी गूड न्यूज दिली असून पत्नी मृदुला आणि नवजात बाळासोबतचा फोटो शेअर केला आहे.

Pankaj Tripathi Becomes Bade Papa: सुपरस्टार पंकज त्रिपाठी, त्यांच्या चित्रपटांमुळे आणि अभिनयामुळे जितके चर्चेत असतात तितकेच त्यांना त्यांचं वैयक्तिक आयुष्य कॅमेऱ्यापासून आणि प्रसिद्धीपासून दूर ठेवायला आवडतं. अशातच सध्या पंकज त्रिपाठींचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पंकज त्रिपाठी त्यांची पत्नी आणि एका चिमुकल्या बाळासोबत दिसत आहेत. फोटो व्हायरल झाल्यापासून सोशल मीडियावर पंकज त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीच्या आयु्ष्यात चिमुकल्याचं आगमन झाल्याचं बोललं जात आहे. पण, ज्या चर्चा सुरू आहेत त्या अगदी खऱ्या आहेत.
पंकज त्रिपाठींच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. पण, पंकज त्रिपाठी आणि त्यांची पत्नी मृदुला आई-बाबा नाहीतर काका-काकी बनले आहेत.
View this post on Instagram
पंकज त्रिपाठींचा ज्या चिमुकल्या बाळासोबतचा फोटो व्हायरल होतोय, ते बाळ अभिनेता परितोष त्रिपाठीचं आहे. फोटोमध्ये पंकज त्रिपाठी आणि त्यांची पत्नी मृदुला बाळासाबोत दिसत आहेत. पंकज त्रिपाठींनी बाळाला हातात घेतलं आहे. तर, पत्नी मृदुला त्यांच्या बाजूला बसली आहे. दोघांच्या डोळ्यांत बाळासाठी खूप प्रेम दिसतंय.
फोटोमध्ये पंकज त्रिपाठींनी कलरफुल टी-शर्ट पँट वेअर केली आहे. तर, मृदुला पिंक सूटमध्ये दिसतेय. फोटो शेअर करत परितोष त्रिपाठीनं कॅप्शन दिलंय. कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "बहुत सारा प्यार।" या पोस्टवर अभिनेता सुनील शेट्टीनंही कमेंट केली आहे. कमेंटमध्ये लिहिलंय की, "भगवान आशीर्वाद दें।" त्यासोबतच, पार्थ समथान, अनूप सोनी आणि नकुल मेहता यांनीही परितोष त्रिपाठीच्या पोस्टवर रिअॅक्शन दिली आहे. चाहत्यांकडूनही या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
परितोष आणि त्यांची पत्नी मीनाक्षी चंदनं 23 मे रोजी आपल्या मुलीचं स्वागत केलं आणि ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली. परितोष त्रिपाठीनं आनंदाची बातमी सांगणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. परितोष एक अभिनेता आणि लेखक आहे. ज्यानं लूडो (2020), जनहित में जारी (2022) आणि केस तो बनता है (2022) यांसारख्या सिनेमांमध्ये मोलाची भूमिका साकारली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :

















