Pandit Bhimsen Joshi Birth Anniversary : वयाच्या 20व्या वर्षी पहिला अल्बम रिलीज, रेडिओ कलाकार म्हणूनही केले काम! वाचा पंडित भीमसेन जोशींबद्दल...
Pandit Bhimsen Joshi : भीमसेन जोशी यांच्या कुटुंबातील जवळपास सर्वच जण संगीताशी निगडीत आहेत. भीमसेन जोशी हे किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक होते. वयाच्या 19व्या वर्षीच त्यांनी गायनाला सुरुवात केली होती.
Pandit Bhimsen Joshi : लोकप्रिय भारतीय गायक पंडित भीमसेन जोशी (Pandit Bhimsen Joshi) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. भीमसेन जोशी यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922 रोजी गडग, कर्नाटक येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गुरुराज जोशी होते, ते स्थानिक हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि कन्नड, इंग्रजी आणि संस्कृतचे अभ्यासक होते. भीमसेन जोशी यांच्या कुटुंबातील जवळपास सर्वच जण संगीताशी निगडीत आहेत. भीमसेन जोशी हे किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक होते. वयाच्या 19व्या वर्षीच त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. शिवाय, त्यांनी संपूर्ण सात दशके शास्त्रीय गायन सुरू ठेवले.
भीमसेन जोशी यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. किराणा घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खान यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. 1932 मध्ये त्यांनी गुरूच्या शोधात राहते घर सोडले होते. त्यानंतर पुढील दोन वर्षे ते विजापूर, पुणे आणि ग्वाल्हेर येथे राहिले. ग्वाल्हेरमध्ये त्यांनी उस्ताद हाफिज अली खान यांच्याकडून संगीताचे धडे घेतले आणि त्यानंतर अब्दुल करीम खान यांचे शिष्य पंडित रामभाऊ कुंडलकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे प्रारंभिक शिक्षण घेतले.
पंडित भीमसेन जोशी हे 1936 साली प्रसिद्ध ‘ख्याल’ गायक होते. ‘ख्याल’सोबतच ‘ठुमरी’ आणि ‘भजना’तही त्यांचे प्रभुत्व होते. भीमसेन जोशी यांनी दोन विवाह केले होते. त्यांच्या पहिल्या पत्नी सुनंदा कट्टी होत्या, ज्यांच्याशी त्यांनी 1944मध्ये लग्न केले होते. त्यांना सुनंदा, राघवेंद्र, उषा, सुमंगला आणि आनंद अशी चार मुले होती. 1951मध्ये, त्यांनी 'भाग्य श्री' या कन्नड नाटकातील त्यांची सहकलाकार वत्सला मुधोळकर यांच्याशी लग्न केले.
वयाच्या 20व्या वर्षी पहिला अल्बम!
भीमसेन जोशी यांनी 1941 साली वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी रंगमंचावर पहिला परफॉर्मन्स दिला होता. त्यांचा पहिला अल्बम वयाच्या 20व्या वर्षी रिलीज झाला, ज्यामध्ये कन्नड आणि हिंदी भाषेत काही धार्मिक गाणी होती. यानंतर दोन वर्षांनी त्यांनी मुंबईत रेडिओ कलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. पंडित भीमसेन जोशी यांनी ‘तानसेन’, ‘सूर संगम’, ‘बसंत बहार’, ‘अनकही’ यासह अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली. भीमसेन जोशी यांनीही अनेक रागांचे मिश्रण करून ‘कलाश्री’ आणि ‘ललित भटियार’ यांसारखे नवीन राग रचले. पंडित भीमसेन जोशी यांचे 24 जानेवारी 2011 रोजी निधन झाले.
हेही वाचा :
- Parineeti Chopra, Arjun Kapoor : 'तुझा आवाज...', अर्जुननं केलं ट्रोल, परिणीतीनं दिली रिअॅक्शन
- Arjun Kapoor : ' ती मला पाहतेय'; अर्जुनला येते आईची आठवण
- MS Dhoni Novel Atharva The Origin : धोनीची नवी इनिंग; ग्राफिक नॉवेलचा फर्स्ट लूक रिलीज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha