एक्स्प्लोर

स्टार प्रवाहच्या 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये लगीनघाई; जीवा-नंदिनी, पार्थ-काव्याचं हटके प्री-वेडिंग शूट PHOTO

या शूटमध्ये जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थ यांचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Marathi serial: Star Pravah वरील लोकप्रिय मालिका  लग्नानंतर होईलच प्रेम सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. कथानक आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचले असून मालिकेत जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याच्या लग्नाची धामधूम सुरू झाली आहे. प्रेमानंतर लग्नाची वेळ आल्याने मालिकेतील वातावरण अक्षरशः उत्साहाने भरून गेलं आहे.

या खास क्षणाला अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी मालिकेतील दोन्ही लोकप्रिय जोड्यांनी नुकतंच एक हटके प्री-वेडिंग फोटोशूट केलं आहे. या शूटमध्ये जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थ यांचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर या फोटोंची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

रेट्रो विरुद्ध काऊबॉय 

‘जुनं ते सोनं’ या म्हणीला साजेसा जीवा-नंदिनीचा लूक खास लक्ष वेधून घेत आहे. दोघेही जणू थेट 80च्या दशकात गेले आहेत, असा रेट्रो टच या शूटमध्ये पाहायला मिळतो. जुन्या काळाची रोमँटिक झलक, स्टायलिश पोशाख आणि दोघांची कमाल केमिस्ट्री यामुळे त्यांचा हा अवतार चाहत्यांना विशेष भावत आहे.

दुसरीकडे, पार्थ-काव्या ही जोडी पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. काऊबॉय थीमवर आधारित त्यांचा हटके लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. स्टाइल, अॅटिट्यूड आणि रोमँसचा तडका यामुळे ही जोडीही तितकीच चर्चेत आली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दोन वेगवेगळ्या शैली, दोन लोकप्रिय जोड्या आणि एकच भावना प्रेमाचा उत्सव! या खास प्री-वेडिंग शूटमुळे मालिकेतील आगामी लग्नसोहळ्याची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे पुढील भागांत काय खास पाहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. प्रेक्षकांना हा सोहळा पाहता येणार आहे दररोज सायंकाळी 7 वाजता, फक्त स्टार प्रवाहवर.

स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही लोकप्रिय मालिका सध्या प्रेक्षकांना भावनांनी भारलेला आणि रोमँसने रंगलेला टप्पा दाखवत आहे. कथानक आता महत्त्वाच्या वळणावर पोहोचले असून जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्या यांच्या लग्नसोहळ्याची धामधूम उत्साहात सुरू झाली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शूट लांबलं अन् प्रेमात पडली...सोनाली खरेचा नवरा खरोखरच तिच्यापेक्षा 27 वर्षांनी मोठा? अभिनेत्रीने सगळंच सांगून टाकलं..
शूट लांबलं अन् प्रेमात पडली...सोनाली खरेचा नवरा खरोखरच तिच्यापेक्षा 27 वर्षांनी मोठा? अभिनेत्रीने सगळंच सांगून टाकलं..
Rohit Shetty News : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीचा भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीच्या भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
सोनू सूदला मदतीवरून फटकारलं, आता राजपाल यादवचा यू -टर्न; हसत आला, मिठी मारली अन्...Video व्हायरल
सोनू सूदला मदतीवरून फटकारलं, आता राजपाल यादवचा यू -टर्न; हसत आला, मिठी मारली अन्...Video व्हायरल
सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी, जोतीरावांची भूमिका साकारणार 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेता
सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी, जोतीरावांची भूमिका साकारणार 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Shetty News : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीचा भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीच्या भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Embed widget