एक्स्प्लोर

The Kerala Story 2 : प्रदर्शनाच्या एक दिवस आधी ‘द केरळ स्टोरी 2’ला हायकोर्टाचा दणका, मेकर्सचे धाबे दणाणले 

ट्रेलर आणि टीझरमधून राज्याची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

The Kerala Story 2 : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या द केरला स्टोरी 2 गोज बियॉन्ड या चित्रपटाच्या प्रदर्शनाला केरळ हायकोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे चित्रपट निर्मात्यांचे धाबे दणाणले आहे . 27 फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये सार्वजनिक धारणा बिघडवण्याची आणि सामुदायिक सलोखा धोक्यात आणण्याची क्षमता असल्याचे न्यायालयाने नमूद केले. (The Kerala story 2 controversy)

लाइव्ह लॉच्या वृत्तानुसार, न्यायालयाने स्पष्ट केले की टीझरमधील मजकूर हा चित्रपटाचाच भाग असल्याचे मान्य करण्यात आले आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम समाजावर होऊ शकतो. तसेच, चित्रपटाला प्रमाणपत्र देताना Central Board of Film Certification (CBFC) ने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले का, यावरही न्यायालयाने प्राथमिक शंका व्यक्त केली.

Kerala story 2 :कोर्टात नेमकं झालं काय ?

सीबीएफसीने या चित्रपटाला UA 16+ प्रमाणपत्र दिले होते. मात्र याचिकाकर्त्यांनी टीझर आणि ट्रेलरमधील कथित भडक आशयावर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली. निर्मात्यांनी प्रचार व्हिडिओतील वादग्रस्त दृश्ये अंतिम चित्रपटात नसतील, असा दावा केला होता. पूर्वी सुनावणीदरम्यान न्यायालयाने चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती; मात्र निर्मात्यांनी स्क्रीनिंग नाकारल्याने न्यायालयाने टीझर आणि ट्रेलरच्या प्रतिलिपींवरच विचार केला.

ऑनलाइन प्रदर्शित होणाऱ्या टीझर-ट्रेलरवर सीबीएफसीचा अधिकार आहे का, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. यावर सीबीएफसीने इंटरनेटवरील मजकुरावर आपला अधिकार नसल्याचे सांगितले. निर्मात्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या युक्तिवादालाही न्यायालयाने फेटाळले. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याची किंवा सामाजिक सलोखा धोक्यात आणण्याची शक्यता असलेला मजकूर हा संविधानाच्या कलम 19(1)(a) अंतर्गत संरक्षित स्वातंत्र्यात येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांनी सीबीएफसीला याचिकाकर्त्यांच्या प्रतिनिधित्वावर दोन आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. चित्रपटाच्या कथित वादग्रस्त मांडणीविरोधात न्यायालयात तीन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

‘प्रोपगंडा’च्या आरोपांवर मौन

चित्रपटाला काही जणांनी ‘प्रोपगंडा मूव्ही’ असेही म्हटले आहे. विशेषतः अनुराग कश्यप आणि प्रकाश राज यांच्या टीकेबाबत विचारले असता मेकर्सनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले. दरम्यान, चित्रपटाविरोधात केरळ हायकोर्टात याचिका दाखल झाल्याची माहिती आहे. ट्रेलर आणि टीझरमधून राज्याची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mithun Chakraborty Sridevi Affair Clim: 'त्यावेळी तीन महिने नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहिलेले...'; श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्तींबाबत चक्रावणारा दावा
'त्यावेळी तीन महिने नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहिलेले...'; श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्तींबाबत चक्रावणारा दावा
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Jeetendra Nephew Award Winning Director: एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?
एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?
Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Embed widget