Operation Sindoor Prediction in Ranveer Allahbadia Podcast: रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये आधीच केलेलं 'ऑपरेशन सिंदूर'चं भाकीत; स्वामी यो म्हणालेले...
Operation Sindoor Prediction in Ranveer Allahabadia Podcast: भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या एअर स्ट्राईकची भविष्यवाणी रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये आधीच झालेली.

Operation Sindoor Prediction in Ranveer Allahbadia Podcast: पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांच्या मृत्यूचा बदला भारतीय सैन्यानं (Indian Army) पाकिस्तानच्या (Pakistan) घरात घुसून घेतला. भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या घरात घुसून तब्बल 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. याला भारतीय सैन्यानं 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) असं नाव दिलेलं. भारतीय लष्कर, वायूदल आणि नौदलानं संयुक्तपणे ही प्रत्युत्तरात्मक कारवाई केली. पण, तुम्हाला माहितीय का? या एअर स्ट्राईकची भविष्यवाणी 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमुळे वादात सापडलेल्या रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये करण्यात आली होती. स्वामी यो यांनी या ऑपरेशनची भविष्यवाणी केली होती, अशी चर्चा सगळीकडे रंगली होती.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या (Ranveer Allahbadia) पॉडकास्टमध्ये स्वामी यो उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी भारतीय सैन्य दलाच्या ऑपरेशनबाबत भविष्यवाणी केली असल्याचं बोललं जात आहे. पॉडकास्टमध्ये स्वामी यो म्हणाले होते की, मे महिन्यात असे ग्रह समीकरण तयार होत आहेत, जे महाभारतासारख्या अनेक मोठ्या युद्धांच्या वेळी तयार झाले होते. सध्या रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टची एक मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते मे महिन्यातील ग्रहांची स्थिती महायुद्धाकडे इशारा करत आहेत, असं म्हणतात. त्यानंतर रणवीर अलाहाबादिया त्यांना विचारतो की, जगात महायुद्ध होईल का?
View this post on Instagram
उत्तर देताना, स्वामी यो म्हणतात की, "हो, ग्रहांचं एक समीकरण जुळून येत आहे. 25 मे च्या आस-पास, जे 6 ग्रह एकमेकांशी एक स्थान बनवत आहेत, ते महाभारत किंवा इतर महायुद्धांच्या काळात ग्रहांचा जो योग जुळून आलेला, तोच योग आताही जुळून येणार आहे. या महायुद्धात, मी म्हणू शकतो की, हा भारतासाठी एक सुवर्णकाळ आहे."
स्वामी यो आहेत तरी कोण?
स्वामी यो यांचं पूर्ण नाव, स्वामी योगेश्वरानंद गिरी आहे. स्वामीजी संन्यासी आहेत. त्याचं स्वतःचं 'स्वामी यो' नावाचं युट्यूब चॅनेल देखील आहे. जिथे स्वामी आध्यात्मिक मार्गदर्शन, योग आणि ध्यानाशी संबंधित व्हिडीओ शेअर करत असतात. स्वामी यो यांनी त्यांच्या एका व्हिडीओमध्ये असंही भाकीत केलंय की, भारत लवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करेल.
स्वामी यो नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ :























