साखळीपासून सुरु होणारी स्टोरी कुठल्या कुठं पोहोचते, अंगावर काटा आणणारा सस्पेन्स-थ्रिलर सिनेमा
Officer on duty movie : साखळीपासून सुरु होणारी स्टोरी कुठल्या कुठं पोहोचते, अंगावर काटा आणणारा सस्पेन्स-थ्रिलर सिनेमा

Officer on duty movie : सस्पेन्स- क्राईम- थ्रिलरचा मसाला असलेल्या चित्रपटांचा मोठा चाहता वर्ग आहे. अनेक प्रेक्षक या जॉनरमधील कोणताही चित्रपट ते चुकवत नाहीत. ओटीटी प्लॅटफॉर्म आल्यानंतर या जॉनरच्या चित्रपटांची लोकप्रियता अधिकच वाढली आहे. प्रेक्षकांच्या आवडीनुसार निर्माते सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांवर भर देत आहेत. हिंदीपासून ते साउथपर्यंत या प्रकारच्या चित्रपटांचा अक्षरशः पूर आला आहे. याच वर्षी रिलीज झालेल्या एका चित्रपटात असे थरारक ट्विस्ट आणि टर्न्स आहेत की ज्यामुळे प्रेक्षकांच्या अंगावर काटा येईल.
याच वर्षी रिलीज झालेल्या एका लो-बजेट चित्रपटाबद्दल जाणून घेऊ या, ज्यामध्ये दृश्यमपेक्षाही जास्त ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. या चित्रपटाचं बजेट फक्त 10 ते 12 कोटी होतं आणि त्याचे कलेक्शन ऐकून तुमचे डोळे विस्फारून जातील. बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवरही मोठी लोकप्रियता मिळवत आहे. सस्पेन्स क्राईम थ्रिलर चित्रपटांची गोष्ट निघाली की दृश्यम, विक्रम वेधा यांसारखे चित्रपट आठवतात. पण, यांना टक्कर देणारा एक मल्याळम चित्रपट म्हणजेच ऑफिसर ऑन ड्यूटी (Officer On Duty).
कुंचाको बोबन, विशाक नायर, प्रियामणी आणि मीनाक्षी अनुप यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 20 फेब्रुवारी 2025 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. जितू अशरफ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मार्टिन फ्रक्कट फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचं बजेट 10 ते 13 कोटी रुपयांचं होतं आणि याने जगभरात तब्बल 55 कोटींची कमाई केली. त्यामुळे हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला.
सिनेमाची स्टोरी काय आहे?
काही चुका झाल्यामुळे हरीशंकर (कुंचाको बोबन) नावाचा पोलिस अधिकारी डीएसपीवरून सर्कल इन्स्पेक्टर पदावर डिमोट होतो. त्याला एका पोलीस स्टेशनचा इन्चार्ज बनवले जाते. तिथे त्याला बनावट दागिन्यांच्या केसची चौकशी करायची असते. सुरुवातीला ही केस त्याला साधी वाटते, पण जसजसा तो चौकशीमध्ये खोल जातो तसतसे त्यामागे एक मोठा क्रिमिनल सिंडिकेट माफिया असल्याचे उघड होते. चित्रपटाचे स्क्रीनप्ले अत्यंत रोचक आहेत. कोणत्याही रेग्युलर सस्पेन्स थ्रिलरची खरी ताकद तिच्या स्क्रीनप्लेमध्ये असते आणि दिग्दर्शक यात पूर्णपणे यशस्वी ठरले आहेत. तब्बल 2 तास 14 मिनिटांच्या कालावधीत प्रेक्षकांना कुठेही कंटाळा येऊ दिलेला नाही. म्हणूनच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे कलेक्शन केले.
या तपासामध्ये हरीशंकरच्या भूतकाळातील काही घटना जोडलेल्या असतात. तो या प्रकरणाचा गूढ उलगडण्याचा प्रयत्न करतो आणि सिंडिकेटविरुद्ध उभा ठाकतो. एका छोट्या चोरीच्या प्रकरणातून सुरुवात होऊन मोठ्या गँगचा पर्दाफाश होतो. पण या तपासादरम्यान हरीशंकरला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते? त्याच्या भूतकाळात काय घडले होते? हे सर्व पडद्यावरच पाहावे लागेल. मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर ठरलेला हा चित्रपट आता ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहे. 20 मार्च 2025 रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिलेल्या चित्रपटांमध्ये त्याची गणना झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या























