Mohammed Rafi Son Shahid Accuses Asha Bhosle: 'लता मंगेशकर, आशा भोसले दोन्ही बहिणी माझ्या वडिलांवर जळायच्या...'; मोहम्मद रफी यांच्या मुलाचा खळबळजनक दावा
Mohammed Rafi Son Shahid Accuses Asha Bhosle: कित्येक दशकं या तिन्ही गायकांनी आपल्या आवाजानं लोकांची मनं जिंकलीत. एवढंच काय तर, आपल्या सुमधुर गाण्यांनी या तिघांनी भारतीय संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख मिळवून दिली.

Mohammed Rafi Son Shahid Accuses Asha Bhosle: हिंदी चित्रपटसृष्टीत (Hindi Film Industry), मोहम्मद रफी (Mohammed Rafi), लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि आशा भोसले (Asha Bhosle) यासारख्या नावांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. बॉलिवूडच्या (Bollywood News) दिग्गज गायकांच्या नावांची यादी करायची झाली तर, या तिन्ही गायकांची नावं सर्वात आधी येतात. कित्येक दशकं या तिन्ही गायकांनी आपल्या आवाजानं लोकांची मनं जिंकलीत. एवढंच काय तर, आपल्या सुमधुर गाण्यांनी या तिघांनी भारतीय संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख मिळवून दिली. अशातच, मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहिद रफी यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
शाहिद रफी यांनी विकी लालवाणी यांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं की, आशा भोसले आणि लता मंगेशकर... या दोन्ही बहिणी त्यांच्या वडिलांवर (मोहम्मद रफी) नाराज होत्या, दोघींनाही त्यांचा राग यायचा आणि म्हणूनच दोघींनी मिळून त्यांची कारकीर्द उद्ध्वस्त केली. शाहिद रफी यांनी असंही म्हटलं की, जेव्हा त्यांचे वडील मोहम्मद रफी यांचं नाव सर्वाधिक गाणी गाण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं जाणार होते, तेव्हा लता मंगेशकर मध्ये आल्या.
सर्वाधिक गाणी गाण्यासाठी लता मंगेशकरांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलंय, असं विचारल्यावर शाहिद रफी म्हणाले की, "लोकांना माहीत नाही. बाबांचं नाव पहिलं आलं, पण लताजी म्हणाल्या नाहीत, मी सर्वाधिक गाणी गायली आहेत. बाबांचं (मोहम्मद रफी) नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी आधीच आलं होतं. त्यानंतर लताजींनी हस्तक्षेप केला आणि सांगितलं की, मोहम्मद रफी नाही, मी जास्त गाणी गायली आहेत. त्यानंतर अब्बांनी माघार घेतली आणि गाणी गात राहिले..."
आशा भोसले, लता मंगेशकर यांच्यावर गंभीर आरोप
विकी लालवानी यांच्या मुलाखतीदरम्यान शाहिद रफी म्हणाले की, त्यांच्या मते लता आणि आशा या दोन्ही बहिणी त्यांच्या वडिलांच्या लोकप्रियतेचा हेवा करत होत्या. त्यांनी आरोप केला की, या रागामुळे मोहम्मद रफी यांच्या कारकिर्दीवर वाईट परिणाम झाला. शाहिद यांनी दावा केला आहे की, दोन्ही बहिणींनी मिळून त्यांच्या वडिलांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला आणि संगीत जगतात त्यांचं योगदान कमी करण्याचा प्रयत्न केला.
आशा भोसलेंवर सडकून टीका
इतकंच नाही तर शाहिद रफी यांनी आशा भोसले यांच्या एका वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आशाजींनी एकदा म्हटलं होतं की, रफी साहेबांच्या आवाजाला रेंज नाही. यावर शाहिद म्हणाले की, त्यांच्या वडिलांच्या आवाजाच्या विविधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं मूर्खपणाचं... तुम्ही विद्वान आहात, तुम्हाला लाज वाटली पाहिजे... या वयात तरी असं करू नका. मी त्यांना हे थेट सांगतोय, देव उपस्थित आहे. माझ्या वडिलांबद्दल कोणी काही बोललं तर मी सहन करू शकत नाही... पुढे बोलताना शाहिद यांनी आठवण करून दिली की, रफी साहेब कधीही विचारत नव्हते की, गाणं कोणत्या अभिनेत्यावर चित्रित केलं जाईल, उलट ते गाण्याच्या परिस्थिती आणि भावनांनुसार त्यांचा आवाज साकारत असत. ही त्यांची सर्वात मोठी ताकद होती.
लता मंगेशकरांसोबत वाद
रफी साहेब आणि लता मंगेशकर यांच्यात याआधीही मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. शाहिदनं खुलासा केला की, त्यांच्यातील मतभेद इतके वाढले होते की, दोघेही बराच काळ एकमेकांशी बोलत नव्हते. दरम्यान, नंतर अभिनेत्री नर्गिस आणि संगीतकार जयकिशन यांच्या पुढाकारानं रफी साहेबांनी लताजींना माफ केलं. त्यानंतर दोघांनीही एका कार्यक्रमात एकत्र सादरीकरण केलं.























