एक्स्प्लोर

Anushka Moni Mohan Das मोठी बातमी: अभिनेत्रीच्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, मुंबईजवळ मालिकांमधील अभिनेत्री रंगेहात सापडली!

Anushka Moni Mohan Das: मुंबईच्या जवळील काशीमिरा पोलीस ठाण्याहद्दीत पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय रॅकेटचा भांडाफोड केला आहे.

Anushka Moni Mohan Das मीरा रोड: सिनेसृष्टीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या जवळील काशीमिरा पोलीस ठाण्याहद्दीत पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय रॅकेटचा भांडाफोड केला आहे. यात 41 वर्षीय अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दास (Anushka Moni Mohan Das) हिला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत दोन टेलिव्हिजन मालिकांमधील तसेच बंगाली सिनेमातील महिला कलाकारांची सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दोन बनावट ग्राहक तयार केले. आरोपींनी ग्राहकांना मुंबई–अहमदाबाद महामार्गालगतच्या काशीमिरा येथील एका मॉलमध्ये बोलावले होते. पोलिसांनी रंगेहात सापळा रचत आरोपींना पैसे स्वीकारताना पकडले आणि त्यांना ताब्यात घेतले.

बंगाली सिनेमातील महिला कलाकारांची सुटका-

अटकेत आलेली अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दास (वय 41) असं नाव आहे.  तर पोलिसांनी सुटका केलेल्या दोन महिला कलाकार, ज्यांनी टीव्ही मालिकांमध्ये तसेच बंगाली चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.  त्यांना ताब्यात घेऊन आश्रयगृहात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 370(3) (मानव तस्करीसंबंधी) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, रॅकेटमागील इतर व्यक्ती, दलाल आणि नेटवर्कबाबत तपास सुरू आहे.

रॅकेटचे इतर धागेदोरे लवकरच समोर येण्याची शक्यता-

पोलिसांनी सांगितले की, “हे रॅकेट उच्चभ्रू समाजातील ग्राहकांसाठी चालवले जात होते. आरोपी अभिनेत्री मध्यस्थाची भूमिका बजावत होती. तिला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.” ही घटना मनोरंजन विश्वाला धक्का देणारी आहे. कारण वेश्याव्यवसायासारख्या घृणास्पद कृत्यात एका अभिनेत्रीचा सहभाग उघड झाल्याने सर्व स्तरांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांचा तपास वाढवला गेला असून या रॅकेटचे इतर धागेदोरे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

डान्सबारवर कारवाई करत 5 बारबालांची सुटका-

महत्वाची बाब म्हणजे काल काशीमीरा पोलिसांनी डान्सबारवर कारवाई करत 5 बारबालांची सुटका केली आहे. शहरातील काशीमीरा परिसरात मध्यरात्री महामार्गालगत असलेल्या “टार्जन डान्सबार”वर काशीमीरा पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी बारच्या आत बनवलेल्या दोन गुप्त केव्हेटीचा पर्दाफाश करून त्यामधून 5 बारबालांची सुटका केली आहे. याशिवाय बारमध्ये काम करणाऱ्या एकूण 12 बारबालांचीही पोलिसांनी मुक्तता केली. तसेच, बार मालक, मॅनेजर, वेटर आदींसह एकूण 21 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीद्वारे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. रेडदरम्यान पोलिसांनी या गुप्त केव्हेटी शोधून काढत त्यातील मुलींची सुटका केली. या धाडीत पोलिसांनी बार मालक, मॅनेजर, वेटर आदींसह एकूण 21 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अशा अवैध बारमाफियांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

हायवेलगतच्या टार्जन डान्सबारवर पोलिसांची मध्यरात्री धाड; दोन गुप्त केव्हेटीमधून 5 बारबालांची सुटका

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget