एक्स्प्लोर

शाहिद कपूरच्या ओ रोमिओ चित्रपटात झळकणार 2 मराठमोळे कलाकार; एक गायक तर, दुसरा..., ट्रेलर पाहिलात का?

Marathi Stars Nana Patekar and Rahul Deshpande in O Romeo Cinema: ‘ओ रोमिओ’चा धमाकेदार आणि रक्तरंजित ट्रेलर प्रदर्शित. नाना पाटेकर आणि राहुल देशपांडे यांची महत्त्वाची भूमिका.

Marathi Stars Nana Patekar and Rahul Deshpande in O Romeo Cinema: 'ओ रोमिओ' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच झाला. अभिनेता शाहिद कपूरचा रावडी लूक पाहून चाहत्यांचा थरकाप उडाला.  या चित्रपटात मुख्य भूमिकेत शाहिद कपूरसह तृप्ती डिमरी झळकणार आहे. ही जोडी एकत्र पहिल्यांदाच बिग स्क्रीनवर दिसणार आहे. व्हॅलेंटाइन डेच्या  आदल्या दिवशी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूर व्यतिरिक्त इतर कसलेले कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.  'ओ रोमिओ' या चित्रपटात  दोन मराठी कलाकारही झळकणार आहे.  या चित्रपटात एका मराठी गायकाचीही प्रमुख भूमिका असल्याची माहिती आहे.

ओ रोमिओ चित्रपटात मराठी कलाकारांची एन्ट्री

साजिद नाडियाडवाला या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.   या 3  मिनिटांच्या ट्रेलरमध्ये प्रचंड रक्तपात पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दोन मराठी कलाकारही झळकले आहेत. नाना पाटेकर या मराठी कलाकाराव्यतिरिक्त  एक लोकप्रिय गायक देखील मुख्य भूमिकेत झळकला आहे. या चित्रपटात गायक राहुल देशपांडे देखील मुख्य भूमिक साकारणार आहेत. राहुल देशपांडे याने आतापर्यंत  मी वसंतराव, कट्यार काळजात घुसली या चित्रपटातून त्याने अभिनयाची छाप सोडली.  प्रेक्षकांनीही त्याच्या कलाकृतीचं कौतुक केलं. 

राहुल देशपांडे झळकणार हिंदी चित्रपटात

दरम्यान, राहुल देशपांडे लवकरच हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.   ओ रोमिओ या चित्रपटात त्याने पोलिसांची भूमिका साकारली असल्याचे ट्रेलरमधून दिसत आहे.  मात्र, राहुल देशपांडे आणि नाना पाटेकर यांची भूमिका काय?  हे लवकरच चित्रपट प्रदर्शित झाल्यावर उघड होईल. दरम्यान, प्रेक्षकवर्ग या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

विशाल - शाहिदची जोडी पुन्हा एकदा एकत्र

कमीने, हैदर आणि रंगुन या चित्रपटानंतर शाहिद कपूर आणि विशाल भारद्वाज यांची  जोडी पुन्हा एकदा ओ रोमिओ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  हा चित्रपट माफीया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकातील  हुसैन उस्ताराच्या पात्रावर आधारीत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.  हा चित्रपट 13 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अफगाण क्रिकेटपटूकडून बॉर्डर 2चं प्रोमोशन; VIDEO शेअर करत चित्रपट बघणार असल्याचं सांगितलं, बॉलिवूड कलाकारांची प्रतिक्रिया व्हायरल

ब्रेकअपच्या चर्चांनंतर तारा सुतारियाची पोस्ट व्हायरल; बोटातील हिऱ्याच्या अंगठीमुळे ‘एंगेजमेंट’ची चर्चा

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
Toxic Yash Animal Scene: यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Embed widget