अफगाण क्रिकेटपटूकडून बॉर्डर 2चं प्रोमोशन; VIDEO शेअर करत चित्रपट बघणार असल्याचं सांगितलं, बॉलिवूड कलाकारांची प्रतिक्रिया व्हायरल
Rashid Khan Shows Love for Sunny Deols Border 2: 23 जानेवारी रोजी बॉर्डर 2 चित्रपट प्रदर्शित होणार. अफगाणिस्तान क्रिकेटपटू रशीद खानने चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली.

Rashid Khan Shows Love for Sunny Deols Border 2: 23 जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या मल्टीस्टारर चित्रपट बॉर्डर 2 ची प्रचंड चर्चा सुरू आहे. चाहते सनी देओलचा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यास उत्सुक आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? ही बॉर्डरची क्रेझ केवळ भारतीयांपुरती मर्यादित नाही, इतर देशातील लोकांना या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू रशीद खान देखील बॉर्डर 2 चित्रपट पाहण्यास प्रचंड उत्सुक आहे. त्यानं अलिकडेच बॉर्डर 2 हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. यामुळे लोकांनी अफगाणिस्तान क्रिकेटपटूचं कौतुक केलं आहे.
रशीद खानचा व्हिडिओ व्हायरल
बरेच क्रिकेटपटू बॉलिवूड चित्रपट तसेच कलाकारांचे फॅन्स आहेत. अफगाणिस्तान टी - 20 क्रिकेट संघाचा कर्णधार रशीद खानने एक इन्स्टाग्रामवर रिल शेअर केला आहे. या रिलमध्ये तो दुबईतील एका महामार्गावरील रस्त्याच्या कडेला उभा असल्याचं दिसून येत आहे. रशीद कुणाशी बोलत असून, मका भाजताना दिसत आहे. या व्हिडिओत क्रिकेटपटू प्रचंड आनंदात दिसत आहे. या व्हिडिओला रशीदने लक्षवेधी कॅप्शन देखील दिलं आहे. "मी बॉर्डर 2 नक्कीच पाहेन", असं त्यानं लिहिलं आहे. व्हिडिओच्या पार्श्वभूमीत 'घर कब आओगे', हा साउंडट्रक वाजत आहे.
या पोस्टमध्ये रशीदने सुनील शेट्टी, अहान शेट्टी, अहान शेट्टी आणि वरूण धवन तसेच सनी देओलला टॅग केलं आहे. रशीदच्या या पोस्टवर बॉर्डर 2 च्या कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेटकऱ्यांनी अफगाणिस्तान क्रिकेटपटूचं कौतुक केलं आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
बॉर्डर 2 चित्रपटातील कलाकारांची व्हिडिओवर कमेंटद्वारे कौतुक
बॉलिवूड कलाकारांनी रशीद खानच्या व्हिडिओवर कमेंट करून त्याचं कौतुक केलं आहे. अहान शेट्टीने 'भाऊ तुला खूप प्रेम', अशी कमेंट केली. तर, वरूण धवनने 'हो भाऊ' अशी कमेंट केली. दरम्यान, सनी देओलच्या बहुप्रतिक्षित बॉर्डर 2 ला पाठिंबा देणारा रशीद खान हा एकमेव क्रिकेटपटू नाही. भारत विकेटकीपर फलंदाज केएल राहुलनेही बॉर्डर 2 या चित्रपटाचे प्रोमोशन केले आहे. केएल राहुलचा या चित्रपटाशी वैयक्तिक संबंध आहे. कारण त्याचा मेहुणा अहान शेट्टी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. चित्रपटातील सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू दोघांनीही केलेल्या प्रोमोशनमुळे बॉर्डर 2 बद्दल आणखी चर्चा निर्माण झाली आहे.
























