एक्स्प्लोर

तुमचा बायोपिक कोणी करावा? अवधूत गुप्तेंचा प्रश्न अन् अजितदादांचं आपसूक उत्तर..डॉ. निलेश साबळे

Nilesh Sable on Ajit Pawar : अजित पवारांनी माझा बायोपिक निलेश साबळे यांनी करावा, असं म्हटलं होतं. याबाबतची माहिती निलेश साबळे यांनी एका मुलाखतीत दिली.

Nilesh Sable on Ajit Pawar : अभिनेते निलेश साबळे (Nilesh Sable) यांनी 'चला हवा येऊ द्या'च्या कार्यक्रमात अनेकदा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मिमिक्री केली होती. त्यानंतर त्यांचे मिमिक्री वाले व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाले होते. दरम्यान, आता निलेश साबळे (Nilesh Sable) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बायोपिकबाबत भाष्य केलंय. "अवधुत गुप्ते यांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला की, तुमच्यावर बायोपिक बनवायचा असेल तर अभिनेता कोण असावा? यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) उत्तर दिलं होतं की, डॉक्टरांनी (निलेश साबळे) करावा", असा खुलासा निलेश साबळे यांनी एका मुलाखतीत केलाय. 

जवळपास वर्षभरापूर्वी अवधुत गुप्ते यांनी अजित पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी अजित पवार म्हणाले होते की, निलेश साबळे यांचा कार्यक्रम पाहिल्यानंतर मला समजलं की, माझ्याकडून भाषणात याठिकाणी-त्याठिकाणी हे शब्द जास्त वापरले जात आहेत. त्यानंतर मी हे शब्द वापरणेच बंद केले. शिवाय यावेळी निलेश साबळे यांनी अजित पवारांसमोरचं त्यांची मिमिक्री करुन दाखवली होती. यावेळी अजित पवारांनी निलेश साबळेंचं कौतुक देखील केलं होतं. 

पुढे बोलताना निलेश साबळे म्हणाले, आपल्या महाराष्ट्राला विनोदवीरांची आणि साहित्यिकांची खूप मोठी परंपरा आहे. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे असतील. त्यांचे आणि पु.ल. देशपांडे यांचे आपण काही किस्से ऐकतो. आचार्य अत्रेंचे किस्से ऐकतो. मला वाटतं आपण ऐवढे मोठे नाहीत. परंतु आपल्याला जेव्हा राजकीय व्यक्ती विनोद समजून घेऊन शाब्बासकी देतात.. तेव्हा बरं वाटतं. तेव्हा तो कलाकारांना एक आश्रय वाटतो. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी निलेश साबळे आणि राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्यामध्ये वाद झालेला पाहायला मिळाला. शरद उपाध्ये यांनी निलेश साबळे यांना अहंकारी असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर निलेश साबळे यांनी देखील सोशल मीडियावर दोन व्हिडीओ शेअर करुन त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. सध्या निलेश साबळे एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे ते 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम होस्ट करणार नाहीत. त्याच्या जागी अभिनेता अभिजीत खांडकेकर हा चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम होस्ट करताना पाहायला मिळणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Yo Yo Honey Singh ची A. R. Rahman आणि आईला अनोखी मानवंदना, दोघांसाठी स्पेशल टॅटू काढला! VIDEO

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बायकोचं निधन, आर्थिक अडचण अन् स्वत:ला संपवण्याचा विचार; नैराश्याला झटकत मराठी अभिनेता नव्या नाटकातून परततोय
बायकोचं निधन, आर्थिक अडचण अन् स्वत:ला संपवण्याचा विचार; नैराश्याला झटकत मराठी अभिनेता नव्या नाटकातून परततोय
बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकांमध्ये चर्चा; तिघांमध्ये नेमकं शिजतयं काय? नवीन गेम स्ट्रटजी कोणती?
बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकांमध्ये चर्चा; तिघांमध्ये नेमकं शिजतयं काय? नवीन गेम स्ट्रटजी कोणती?
इस्त्रायल- इराणच्या युद्धजन्य स्थितीच्या कचाट्यात सापडली मलायका अरोराची आई, घाबरत म्हणाल्या; 'डोळ्यांसमोर क्षेपणास्त्र अन्...
इस्त्रायल- इराणच्या युद्धजन्य स्थितीच्या कचाट्यात सापडली मलायका अरोराची आई, घाबरत म्हणाल्या; 'डोळ्यांसमोर क्षेपणास्त्र अन्...
सेक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडेची बायको आठवतेय? मराठी अभिनेत्री जीवघेण्या आजाराशी झुंजतेय, हृदयद्रावक पोस्ट
सेक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडेची बायको आठवतेय? मराठी अभिनेत्री जीवघेण्या आजाराशी झुंजतेय, हृदयद्रावक पोस्ट

व्हिडीओ

Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?
Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Gold Rate : युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
Embed widget