एक्स्प्लोर

महाराष्ट्र केसरी | पहिल्या फेरीत अभिजीत कटके सहा सेकंदात विजयी

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. आज दुसऱ्या दिवशी सर्वांचं लक्ष असलेल्या पैलवान अभिजीत कटकेनं अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजय मिळवला. तोही अवघ्या सहा सेकंदात. पुणे शहरच्या अभिजीत कटकेनं अमरावतीच्या मिर्झा नदिम बेगला अवघ्या सहा सेकंदात चितपटीनं पराभूत केलं.

पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मॅट विभागातल्या पहिल्या फेरीच्या लढती सुरू झाल्या आहेत. आज दुसऱ्या दिवशी रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. आज दुसऱ्या दिवशी सर्वांचं लक्ष असलेल्या पैलवान अभिजीत कटकेनं अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजय मिळवला. तोही अवघ्या सहा सेकंदात. पुणे शहरच्या अभिजीत कटकेनं अमरावतीच्या मिर्झा नदिम बेगला अवघ्या सहा सेकंदात चितपटीनं पराभूत केलं. गेल्या वेळचा उपविजेता अभिजीतनं बेगला सहा सेकंदात पराभूत करुन आक्रमक सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे मुंबई शहरच्या समाधान पाटीलने हिंगोलीच्या दादूमियां मिलानीला चितपट करत विजय मिळवला. लातूरच्या सागर बिराजदारने नांदेडच्या विक्रम वडतिलेला पराभूत करत विजय मिळवला. सागरने 19 सेकंदात विजय मिळवला. दुसरीकडे 79 आणि 57 किलो मॅट विभागाच्या कुस्ती आज खेळवण्यात आल्या. या दोन्ही विभागात सोलापूरचे पैलवान रामचंद्र कांबळे आणि ज्योतिबा अटकळेनं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. 79 किलो मॅट विभागाच्या अंतिम फेरीत रामचंद्र कांबळेनं उस्मानाबादच्या रवींद्र खैरेला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर 57 किलो विभागात ज्योतिबा अटकळेनं कोल्हापूरच्या रमेश इंगवलेवर मात केली. मूळचे कोल्हापूरचे असलेले ज्योतिबा आणि रामचंद्र हे दोघंही पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे पैलवान आहेत. तिथं ते अर्जुनवीर काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. कालपासून पुण्यात महाराष्ट्र शासनाच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या 63 व्या पर्वाची सुरुवात झाली. काल पहिल्या दिवशी काका पवार यांच्या पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या पैलवानांनी वर्चस्व गाजवलं. 57 किलो माती विभागात आबासाहेब आटकळेनं सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने अंतिम सामन्यात मूळच्या कोल्हापूरच्या पण आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा पैलवान असलेल्या संतोष हिरुगडेचं आव्हान मोडीत काढलं. संतोषला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. तर 79 किलो माती विभागात धर्मा शिंदेनं कांस्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्र केसरीच्या 79 किलो माती विभागात उस्मानाबादच्या हणुमंत पुरीनं बाजी मारली. हणुमंतने सोलापूरच्या सागर चौगुलेचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. तर सागरला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde : आत्महत्या केलेल्या गणेश बडेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी घेणार, पंकजा मुंडेंनी केलं कुटुंबियांचं सांत्वन
आत्महत्या केलेल्या गणेश बडेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी घेणार, पंकजा मुंडेंनी केलं कुटुंबियांचं सांत्वन
Sunny Deol Border 2 Movie :  'बॉर्डर'मध्ये 'हा' सीन करताना रडला होता सनी देओल, पण चित्रपटात ऐनवेळी लागली कात्री
'बॉर्डर'मध्ये 'हा' सीन करताना रडला होता सनी देओल, पण चित्रपटात ऐनवेळी लागली कात्री
Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kalyan Durgadi Fort : ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी, शिवसेनेचं दुर्गाडी परिसरात आंदोलनABP Majha Headlines : 07 AM : 17 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waikar Special Report : रवींद्र वायकर यांच्या माणसाजवळ EVM चा ओटीपी?ABP Majha Headlines : 11 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde : आत्महत्या केलेल्या गणेश बडेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी घेणार, पंकजा मुंडेंनी केलं कुटुंबियांचं सांत्वन
आत्महत्या केलेल्या गणेश बडेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी घेणार, पंकजा मुंडेंनी केलं कुटुंबियांचं सांत्वन
Sunny Deol Border 2 Movie :  'बॉर्डर'मध्ये 'हा' सीन करताना रडला होता सनी देओल, पण चित्रपटात ऐनवेळी लागली कात्री
'बॉर्डर'मध्ये 'हा' सीन करताना रडला होता सनी देओल, पण चित्रपटात ऐनवेळी लागली कात्री
Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Embed widget