एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Falguni Pathak : वयाच्या नवव्या वर्षी पहिला स्टेज शो, शेकडोहून अधिक गाणी; तब्बल 33 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या 'गरबा क्वीन'चा जाणून घ्या जीवन परिचय

Falguni Pathak : फाल्गुनी पाठक एक अशी गायिका आहे जिने आपल्या संस्कृतीला एक नवीन ओळख मिळवून दिली. आणि आपले नाव सातासमुद्रापार पोहोचविले.

Falguni Pathak : नवरात्रोत्सव (Navratri 2022) जसजसा जवळ येऊ लागला आहे. तशी या उत्सवाबद्दल, परंपरेबद्दल आणि गाण्यांबद्दल उत्सुकता अधिक वाढली आहे. नवरात्रोत्सवात तमाम तरूणाईला आकर्षित करणारा भाग म्हणजेच गरबा (Garba). आणि याच गरब्यातील गाणी गाऊन सर्वांचं मनोरंजन करणारी, जिच्या गाण्यावर ठुमके मारल्याशिवाय गरबा अपूर्णच अशी 'गरबा क्वीन' म्हणजेच फाल्गुनी पाठक (Falguni Pathak). फाल्गुनी एक अशी गायिका आहे जिने आपल्या संस्कृतीला एक नवीन ओळख मिळवून दिली. आणि आपले नाव सातासमुद्रापार पोहोचविले.

फाल्गुनी पाठकचा जन्म 12 मार्च, 1964 रोजी मुंबईत झाला. फाल्गुनीने तिचे महाविद्यालयीन शिक्षण मिसेस एम.एम.कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून बी.कॉम.ची पदवी घेतली. तुम्ही फिल्मी गाण्यांवर कितीही नाचलात तरी भक्तिगीतांवर नाचण्याची कला जरा अवघडच वाटते. पण, फाल्गुनी पाठकच्या भक्तिगीतांवर नाचण्यापासून तुम्ही स्वतःला थांबवूच शकत नाही. केसरीयो रंग, ओढणी ओढू के उडी उडी जाये, वादघडी वारसी, राधा ने श्याम, परी हूॅं में, यांसारखी अनेक गरबा गाणी प्रसिद्ध आहेत. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून स्टेज परफॉर्मन्स देणाऱ्या फाल्गुनी पाठकविषयी काही मनोरंजक माहिती जाणून घ्या. 

1998 मध्ये पहिला अल्बम लॉन्च 

फाल्गुनीने तिच्या करिअरची सुरुवात 1998 मध्ये केली होती. तिचा पहिला अल्बम 1998 मध्ये लाँच झाला होता. यानंतर फाल्गुनीने अगदी असंख्य गाणी गायली. फाल्गुनीने फक्त भारतातच नाही तर परदेशातही नाव कमावले. विशेष म्हणजे, फाल्गुनीने भारतात आपल्या सुराच्या ताकदीने इतके फॅन फॉलोअर्स वाढवले ​​की, तिने चक्क बॉलिवूडचा रेकॉर्ड मोडला.

1994 मध्ये, फाल्गुनी पाठक म्हणजेच ​​गरबा क्वीनने 'ता-थैया' नावाचा स्टेज बँड सुरू केला. या बॅंडचे केवळ भारतातच नाही तर परदेशातही परफॉर्मन्स होतात. फाल्गुनी पाठकने 1998 मध्ये युनिव्हर्सल म्युझिकसह 'याद पिया की आने लगी' या तिच्या पहिल्या अल्बमद्वारे नवीन प्रसिद्धी मिळवली. फाल्गुनीची बहुतेक गाणी प्रेमावर आधारित आहेत.  नवरात्रीमध्ये गायलेली भक्तिगीतेही फार प्रसिद्ध आहेत. 

फाल्गुनी पाठकची काही प्रसिद्ध गाणी : 

  • ओ पिया - 2001
  • अर्पण - 2008
  • मेरी चुनर उड उड जाये - 2000
  • ये कैसा जादू किया - 2002
  • दिल झूम झूम नाचे - 2004
  • मैने पायल है छनकाई - 1999
  • याद पिया की आने लगी - 1998

'वासलडी' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

गेली 33 वर्ष सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही गरबा क्वीन पुन्हा एकदा आपल्या मंजुळ आवाजाने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतेच फाल्गुनीचे 'वासलडी' (Vasaladi) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांसाठी थांबलेला गरबा आता पुन्हा फाल्गुनीच्या आवाजाने गुंजणार आहे यात शंका नाही. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaCM Eknath shinde Special Report : फडणवीसांप्रमाणे शिंदे सहज मुख्यमंत्रीपद सोडतील ?Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget