एक्स्प्लोर

Navra Maza Navsacha Fame Actor Fight With Brain Hemorrhage: 'नवरा माझा नवसाचा' फेम अभिनेत्याला ब्रेन हॅमरेज; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मदतीनंतर रंगभूमीवर दमदार कमबॅक, काय घडलं?

Navra Maza Navsacha Fame Actor Fight With Brain Hemorrhage: मराठी अभिनेत्याला गंभीर आजारानं ग्रासलं, उपचारांसाठी आर्थिक मदतीची होती गरज, त्याचवेळी एकनाथ शिंदेंना कळालं आणि त्यांनी उपचारांचा खर्च उचलला, आता अभिनेत्यानं आजारावर मात केलीय.

Navra Maza Navsacha Fame Actor Fight With Brain Hemorrhage: मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Industry) दिग्गज सेलिब्रिटींच्या अभिनयानं सजलेला 'नवरा माझा नवसाचा' (Navra Mazha Navsacha) सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office) गाजला. मल्टीस्टारर सिनेमाचं दिग्दर्शन सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) यांनी केलं होतं. तसेच, मुख्य भूमिकाही त्यांनी साकारलेली. अशातच त्यांच्याशिवाय सिनेमात सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar), अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्यासह अनेक मोठे कलाकार दिसून आले होते. यासर्व दिग्गजांसोबतच आणखी एक गुणी अभिनेता या सिनेमात दिसला होता. पण, त्यानंतर मात्र हा अभिनेता काही काळ इंडस्ट्रीपासून दूर गेल्याचं पाहायला मिळालं. 'नवरा माझा नवसाचा' सिनेमात या अभिनेत्यानं साकारलेल्या भूमिकेचं विशेष कौतुक करण्यात आलं होतं. 

आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलत आहोत, त्याचं नाव विकास समुद्रे (Vikas Samudre). 'नवरा माझा नवसाचा' सिनेमात विकास समुद्रेनं चिपळूणच्या व्यक्तीची लोकप्रिय भूमिका साकारली होती. बस प्रवासात ऑनस्क्रिन बायकोसोबत प्रवास करणाऱ्या अभिनेता विकास समुद्रेनं चाहत्यांचं मन जिंकलं. पण गेल्या काही वर्षांपासून विकास अभिनय क्षेत्रापासून दूर गेलेले. त्याचं कारण त्याला झालेला गंभीर आजार. गेले कित्येक दिवस मराठी सिनेसृष्टी आणि टीव्ही इंडस्ट्री गाजवणारा असाच एक अभिनेता गेल्या काही वर्षांपूर्वी ब्रेन हॅमरेज सारख्या गंभीर आजाराशी तोंड देत होता.  

काही मोजकेच चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारा हा अभिनेता फिल्म इंडस्ट्रीतून अचानक कसा गायब झाला? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. अखेर आता विकासच्या अचानक गायब होण्याचं कारण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकासला 2018 मध्ये आजाराचं निदान झालं. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे उपचारांसाठी पैशांची चणचण भासू लागली. उपचारांसाठी विकासला आर्थिक मदतीची गरज होती. यासाठी त्याच्या कुटुंबियांनी लोकांना मदतीचं आवाहन केलं. पण, मिळालेली मदत पुरेशी नव्हती. विकासला या आजाराच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी आणखी पैशांची गरज होती.  

एकनाथ शिंदेंनी दिला मदतीचा हात 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विकास समुद्रेच्या परिस्थितीबाबत माहिती मिळाली. त्यावेळी शिंदेंनी कोणतेही आढेवेढे न घेता विकास समुद्रेला मदतीचा हात देऊ केला. पुढे गंभीर आजाराला झुंज देऊन विकास त्यातून पुर्णपणे बरा झाला. पण, बरं झाल्यानंतर विकासनं दणक्यात पदार्पण केलं. संतोष पवार यांच्या 'सुंदरा मनामध्ये भरली' नाटकाद्वारे विकास समुद्रे पुन्हा एकदा रंगभूमीवर परतला. या नाटकात विकासनं दुहेरी भूमिका यशस्वीपणे साकारली. 

आजारपणाचा काळ फार कठीण, अनेक गोष्टींना मी मुकलो : विकास समुद्रे 

आपल्या आजारपणाबाबत अभिनेत्यानं एका मुलाखतीत बोलताना भाष्य केलं होतं. अभिनेता म्हणाला होता की, "आजारपणाचा काळ फार कठीण होता. अनेक गोष्टींना मी मुकलो‌. प्रकृतीच्या काळजीने अभिनयाबरोबरच दिग्दर्शक म्हणूनही रसिक सेवा करणार आहे. गेली 20-22 वर्ष प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले ते असेच असावे. रसिकांचं प्रेम आणि शुभेच्छांमुळेच मी पुन्हा उभा राहतो आहे." 

दरम्यान, अभिनेता विकास समुद्रेनं अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात. 'फू बाई फू' या टीव्ही शोमध्ये विकासनं धम्माल उडवून दिलेली. विकासला खरी लोकप्रियता याच टेलिव्हिजन शोमधून मिळाली. विकासनं पुढेही विविध टीव्ही शो आणि पुरस्कार सोहळ्यातून कॉमेडी भूमिका केल्या. त्यानंतर 'नवरा माझा नवसाचा' सिनेमातून विकासनं साकारलेली भूमिका सर्वांच्याच लक्षात राहिली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Vikrant Massey On Son Vardaan Religion: विक्रांत मेस्सीचा मुलगा ना हिंदू, ना मुस्लिम, ना ख्रिश्चन; वरदानच्या धर्माबाबत अभिनेत्यानं घेतला मोठा निर्णय!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Maharashtra Local Body Election: नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Nandurbar News: सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
Embed widget